आले एवढे चाकरमानी? प्रशासनाचा अंदाज कसा झाला फेल? वाचा....

Chakarmani issue kokan Sindhudurg
Chakarmani issue kokan Sindhudurg
Updated on

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात गणेशोत्सव सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. सुमारे दीड लाख चाकरमानी दाखल होतील, असा प्रशासनाचा अंदाज होता; मात्र गणेशोत्सवाच्या आदल्या दिवसापर्यंत 1 ऑगस्टपासून जिल्ह्यात केवळ 39 हजार 767 चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यामुळे "चाकरमान्यांना गाववाल्यांची काळजी' अशी चर्चा गाववाल्यांत सुरू झाली आहे. 

सिंधुदुर्ग आणि चाकरमानी यांच्यात वेगळे नाते आहे. हे नाते जगात वेगळे असून आपुलकीचे असलेल्या या नात्याची ओळख जगात आहे. एकेकाळी चाकरमानी पाठवित असलेल्या मनीऑर्डरवर गाववाले आपली उपजीविका चालवत असत.

अलीकडे यात थोडा बदल झाला असून गावकडची मंडळी आर्थिक दृष्टया स्वयंपूर्ण बनत चालली आहे. तरीही भावनिक नाते कमी झालेले नाही. त्याच बरोबर कोकणात जगात सर्वात उत्साही व मोठ्या स्वरुपात घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो. जगाच्या पाठीवर कुठेही कामानिमित्त असलेले चाकरमानी या उत्सवात भाविक म्हणून मोठ्या संख्यने आपआपल्या गावी दाखल होतात. गणेशोत्सव आणि चाकरमानी हे अजुन वेगळे नाते आहे. 

गाववाल्यांची काळजी 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हॉटस्पॉट असलेल्या शहरातून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले होते. गणेशोत्सव काळात सुमारे दीड लाख चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतील, असा प्रशासनाचा अंदाज होता; मात्र 1 ऑगस्ट पासून 21 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ 39 हजार 767 चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यामुळे कामानिमित्त परजिल्ह्यात असलेल्या चाकरमान्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या गाववाल्यांची काळजी घेतलेली दिसतेय. 

सुविधा असुनही... 
गाववाल्यांच्या नेहमी सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या चाकरमान्यांनी आहे तिथेच राहण्याचे पसंद केल्याचे दिसते. आपण गावात गेल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढू नये. गावचे आरोग्य धोक्‍यात येवू नये. कोरोना सारख्या व्हायरसचा विळखा गावातील नागरिकांना पडू नये, यासाठी चाकरमानी शासनाने एसटी, रेल्वे यासारखी विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेली असतानाही अपेक्षेप्रमाणे दाखल झाले नसल्याचे दिसते. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com