महसूल उत्पन्नाचे सिंधुदुर्गसमोर आव्हान 

The challenge of revenue generation in front of Sindhudurg
The challenge of revenue generation in front of Sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग) - साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्याच्या तिजोरीवर मोठा भार आला असून महसुली उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावरील महसुली कर उत्पन्न हाच आधार शासनाकडे असल्याने जिल्हा प्रशासनाला आता विविध मार्गातून महसुली उत्पन्न मिळविण्यासाठी मोठे आव्हान आहे. कोरोनाच्या लॉकडाउनचा लांबलेला कालावधी आणि बंद असलेले व्यवसाय, उद्योग अजूनही सावरलेले नाहीत; पण प्रशासनाला महसुली उद्दीष्ट गाठून विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा रूळावर आणावी लागणार आहे. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत आहे. वाळू, जांभा दगड, खडी यातूनही मोठ्या प्रमाणात महसुली उत्पादन मिळत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सातत्याने शासनाकडून महसूल विभागाला उद्दिष्ट वाढवून दिले जात आहे. ते गाठण्यासाठी शासनस्तरावर प्रशासकीय अधिकारी प्रयत्नशील असतात यंदा मात्र उद्दिष्ट गाठण्याच्या वेळेला कोरोनाचे संकट पुढे आले आणि महसुली तूट मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासन स्तरावर आता महसुली उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कंबर कसावी लागणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांची तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना महसुली उद्दिष्ट गाठण्यासाठी सूचना केल्या आहेत.

दंडात्मक नोटीस देऊन सक्तीने वसुली केली जाणार आहे. मागील आर्थिक वर्षात गौणखनिज असो किंवा इतर खनिज. म्हणावी तशी उद्दिष्टपूर्ती झाली नाही. कोरोनाच्या काळात अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात सुरू होते. यामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसुली घट झाली आहे. आता हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी शासनस्तरावरील इष्टांक गाठण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मागील आर्थिक वर्षाचे आणि यंदाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आता महसूलचे अधिकारी रस्त्यावर येऊन अवैध व्यवसाय रोखण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. 

अवैध व्यवसाय रोखण्याचे आव्हान 
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा व्यवसाय सुरू आहे. त्याचबरोबर बेकायदा जांभा दगड उत्खनन, लिलाव न झालेल्या गटातील अवैध वाळू उपसा, गौण खनिजाचे होणारे उत्खनन, राजरोसपणे खडी व्यवसाय आणि त्याची वाहतूक सुरू आहे. जिल्हा प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. यासाठी आता प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडक आणि धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. 

उद्दीष्टाचा चढउतार 
*जमिन महसूल उद्दीष्ट 2019-20 - 28 कोटी 57 लाख 47 हजार 
* मार्च अखेर वसुली- 21 कोटी 93 लाख 
*गौण खनीज उद्दीष्ट 2019-20 - 47 कोटी 
* मार्च अखेर वसुली - 42 कोटी 29 लाख 32 हजार 
*एकूण उद्दीष्ट - 75 कोटी 57 लाख 47 हजार 
*मार्च 2020 अखेर वसूली - 64 कोटी 74 लाख 69 हजार 
*येणे वसुली कर - 10 कोटी 82 लाख 78 हजार 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com