केशवसुत कट्ट्याचा लूक बदलू ; दीपक केसरकर

आमदार दीपक केसरकर : सावंतवाडीच्या मोती तलावाकाठी होणार खाऊ गल्ली
change the look of Keshavsut Katta Deepak Kesarkar
change the look of Keshavsut Katta Deepak Kesarkarsakal

सावंतवाडी : शहरातील केशवसुत कट्टाचे स्वरूप बदलण्यात येणार असून एकप्रकारे नवीन लूक या कट्ट्याला देण्यात येणार आहे; मात्र त्याआधी सांगली येथील वालचंद महाविद्यालयाच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट करूनच पुढचे पाऊल उचलू, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हॉटेल पॉम्पससमोर तलावाच्या काठावर माजी नगराध्यक्ष (कै.) दत्ताराम वाडकर यांच्या नावे खाऊगल्ली उभारण्यात येणार असून या ठिकाणी शहरातील महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती आमदार केसरकर यांनी दिली. त्यांनी स्वतः शुक्रवारी सायंकाळी केसवसुत कट्टा आणि तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, आर्किटेक्ट अमित कामत आदी उपस्थित होते.

पाहाणी केल्यानंतर केशवसुत कट्ट्याचे कशा पद्धतीने नूतनीकरण करावे यासाठी स्थानिकांशी चर्चा केली. त्यानंतर ते म्हणाले, ‘‘मोती तलावाच्या काठावर पॉम्पस हॉटेल समोर असलेल्या जागेत माजी नगराध्यक्ष दत्ताराम वाडकर यांच्या नावाने खाऊगल्ली उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी महिला बचत गटाच्या माध्यमातून खाऊचे स्टॉल उभारण्यात येतील. महिलांनी सकाळी तेथे स्टॉल लावायचे आणि सायंकाळी ते उचलायचे. येथे रोज सायंकाळी स्वच्छता केली जाईल. परिसर अस्वच्छ होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.’’

बोटिंग सेवाही

ते पुढे म्हणाले, ‘‘केशवसुत कट्ट्याला नूतनीकरणासह नवा लूक देण्याचा मानस आहे. आर्किटेक्ट कामत हे त्यासाठी प्लॅन आखणार आहेत. त्याआधी सांगली येथील वालचंद महाविद्यालयाच्या माध्यमातून स्ट्रक्चरल ऑडिट करू, येथील नगरपालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिटबाबतही खात्री केली जाणार आहे आणि त्यानंतरच निर्णय घेऊ. या ठिकाणी असलेली तुतारी नव्याने बसविण्यात येणार आहे. मात्र, सद्यस्थितीत तात्पुरती डागडुजी करण्यात येणार आहे. मोती तलावात बोटिंग प्रकल्प पुन्हा सुरु करू, त्यासाठी आवश्यक परवानग्या घेऊ.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com