पाठलाग करून कणकवलीजवळ बनावट दारू पकडली

0
0

कणकवली : गोवा ते उत्तर प्रदेश अशी दारू वाहतूक करणारा ट्रक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलिसांनी शहरातील नरडवे तिठा येथे सोमवारी थरारक पाठलाग करून पकडला. ट्रकमध्ये 12 लाख 97 हजार 500 रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. याप्रकरणी ट्रकचालक खलीक खान (वय 37, रा. उत्तरप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

गोव्यातून ट्रकमधून अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ओसरगाव येथे पोलिसांनी पाळत ठेवली होती. ट्रक ओसरगाव येथे आल्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, ट्रक चालकाने पोलिसांना हुलकावणी देत तेथून कणकवलीच्या दिशेने पळवला. त्यानंतर कणकवली पोलिसांनी ट्रकचा पाठलाग सुरू केला. शहरातील नरडवे तिठा येथे ट्रक अडविण्यात आला. 
सायंकाळी उशिरा ट्रक कणकवली पोलिस ठाण्यात आणण्यात आला. यावेळी ट्रकच्या हौद्यामध्ये लपवून ठेवलेली सुमारे तेरा लाखांची गोवा बनावटीची दारू आढळून आली. अवैधपणे दारू वाहतूक, तसेच पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतरही ट्रक घेऊन पसार झाल्याप्रकरणी चालक खान विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. 

यांनी केली कारवाई...
कणकवलीचे पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक बापू खरात, हवालदार अनमोल राणे, कॉन्स्टेबल रूपेश गुरव आदींनी ही कारवाई केली. 

संपादन : विजय वेदपाठक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com