
मुलांना शिवरायांचा इतिहास कळावा व त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून माजी राज्यमंञी रवींद्र माने व मार्गदर्शक माजी आमदार सुभाष बने यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा घेण्यात येते...
बाल मावळ्यांनी साकारले रायगड, तोरणा....
साडवली (रत्नागिरी) : चिमुकल्या दोनशे हातांनी साकारले पंधरा किल्ले देवरुख येथे शिवजयंती निमित्त किल्ले बनवा स्पर्धासंगमेश्वर तालुका क्षञिय मराठा समाज देवरुखवतीने मराठा भवन येथे शिवजयंती सोहळा आयोजित केला आहे.या निमित्ताने शालेय मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा घेतली गेली.या स्पर्धेमुळे बाळगोपालांना आनंद झाला आणि दगड,धोंडे,मातीत दोनशे हात गुंतले व सुरेख पंधरा किल्ल्यांची उभारणी झाली.
हेही वाचा- लोकनाट्याचा राजा हरपला : ज्येष्ठ अभिनेते राजा मयेकर यांचे निधन
शिवजयंतीला किल्ले पहाता येणार
शिवरायांचे हे नवीन मावळे किल्ले बांधण्यात दोन दिवस रमुन गेले. आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करत गटागटाने हे किल्ले उभारले.शिवजयंतीला हे किल्ले सर्वांना पहाता येणार आहेत.मुलांना शिवरायांचा इतिहास कळावा व त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून माजी राज्यमंञी रवींद्र माने व मार्गदर्शक माजी आमदार सुभाष बने यांच्या पुढाकाराने या स्पर्धा घेण्यातळ आल्या.शाळा शाळांच्या गटाने यात सहभाग घेतला.
हेही वाचा- वन्य प्राण्यांचा त्रास आला आता शेतीच्या मुळावर.....
शिवजयंती तयारी जोरात
शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर चिञे रेखाटा अशी पहीली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी चिञकला स्पर्धाही घेण्यात आली.शिवजयंती निमित्त मराठा भवनचा परीसर चैतन्यमय बनुन गेला.