ओमिक्रॉनला रोखण्यासाठी चिपी विमानतळावर कडक निर्बंध :के. मंजुलक्ष्मी

चिपी विमानतळावर प्रवाशांच्या तपासण्या करा
K.Manjulakshmi
K.ManjulakshmiEsakal
Updated on

ओरोस : ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा प्रसार असलेल्या देशांमधून मुंबई (Mumbai)विमानतळावर उतरून चिपी विमानतळावर (Chipi Airport)उतरणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी प्राधिकरणाद्वारे स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यांची माहिती आरोग्य विभागास कळवावी. अशा प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याबाबत कार्यवाही करावी आणि त्या प्रवाशांची आरटीपीआर चाचणी दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी करावी. यापैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास प्रवाशाला रुग्णालयात दाखल करावे. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना आणखी सात दिवस होम क्वारंटाईन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी (K.Manjulakshmi)यांनी आज दिले.

आदेशात म्हटले आहे, की ओमिक्रॉन दक्षिण आफ्रिकेसह अन्य काही देशांमध्ये आढळून आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने हवाई वाहतुकीवर निर्बंध लावलेले आहेत. जिल्ह्यात ओमीक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांद्वारे जिल्ह्यातील हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी निर्बंध लागू केले आहेत. ते असे ः कोरोना मार्गदर्शक सूचना तसेच वेळोवेळी दिलेले आदेश किमान निर्बंध म्हणून काम करतील. आंतरराष्ट्रीय प्रवासी मुंबई विमानतळावर उतरून विमानाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करू शकतील. त्यांच्यासाठी चिपी विमानतळावर विमानतळ प्राधिकरणाद्वारे स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करावी. अशा प्रवाशांची माहिती आरोग्य विभागास कळविवी.

K.Manjulakshmi
तारीख, वेळ निश्चित करा! जनतेसमोर हिशोब देणार: पाटलांचा इशारा

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी विमानतळ प्राधिकरणाकडून माहिती मिळालेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यासाठी वेगळ्या पथकाची नियुक्ती करावी. अशा प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे. प्रवाशांची आरटीपीआर चाचणी दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी करावी. यापैकी कोणतीही चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास प्रवाशाला रुग्णालयात दाखल करावे. सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्यास प्रवाशांना आणखी ७ दिवस होम क्वारंटाईन करावे.

ओमिक्रॉनचा प्रसार झालेले देश वगळता इतर कोणत्याही देशामधून आलेल्या प्रवासी विमानतळावर आल्यास आरटीपीआर चाचणी अनिवार्य राहील. हा अहवाल निगेटिव्ह आला तरी अशा प्रवाशांना १४ दिवस होमक्वारंटाईन करावे. आरटीपीआर चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करा. याबाबतची कार्यवाही जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा शल्य चिकित्सकांनी समन्वयाने करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com