
ज्यावेळी भारतात हरितक्रांतीसाठी रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचे मोठ्याप्रमाणावर स्वागत होते, त्याचवेळी अमेरिका आणि युरोपमध्ये मात्र रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांबद्दल लोकांमध्ये जागृती केली जात होती. याची सुरुवात अमेरिकेतील रिचेल कार्सन यांच्या ‘सायलेंट स्प्रिंग’ या १९६० ला प्रसिद्ध झालेल्या पुस्तकामुळे झाली. त्यानंतर अनेक संशोधन, केस स्टडिज आणि अभ्यास या संदर्भात केले गेले आणि संपूर्ण जगाला हादरवणारे निष्कर्ष पुढे आले.
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी, सृष्टिज्ञान संस्था