मासेमारीतील अतिक्रमण रोखण्यासाठी कायदा करण्याचे काम केंद्रात सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

कणकवली - मासेमारीच्या संदर्भात होणारे परप्रांतियांचे अतिक्रमण रोखण्यासाठी कायदा करण्याचे काम केंद्रात सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

कणकवली - मासेमारीच्या संदर्भात होणारे परप्रांतियांचे अतिक्रमण रोखण्यासाठी कायदा करण्याचे काम केंद्रात सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.

कणकवली येथील जनादेश यात्रेत मुख्यमंत्री तीन तासाहून अधिक काळ उशीराने दाखल झाले. त्यामुळे जनतेला ताटकळत बसावे लागले. जनादेश यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. दरम्यान फोडाघाट येथील बाजारपेठेत मोठ्या उत्साहात महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, रविंद्र चव्हाण, किरीट सोमय्या उपस्थित होते. पुढच्या तीन वर्षात कोकण टँकर मुक्त करणार अशी घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. पर्यटनाचा हा जिल्हा आहे. यात पर्यटनाच्या माध्यमातून विकास करण्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या काळात जेवढे काम झाले त्याच्या तुलनेत आम्ही पाच वर्षात दुप्पट काम केले आहे. आघाडी सरकारने पंधरा वर्षात ३० हजार कोटींची मदत केली तर आमच्या युती सरकारने ५० हजार कोटींची मदत केली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis comment