पिण्याच्या पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून तब्बल एवढा निधी मंजूर...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

मसुरे-आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालकमंत्र्यांकडे सुपूर्द...

आंगणेवाडी (सिंधुदूर्ग) : आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. आंगणे कुंटुंबयाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यानंतर सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या मसुरे (आंगणेवाडी)  लघुपाटबंधारे योजनेच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री उदय सामंत याच्याकडे सुपूर्द केले. आंगणेवाडी येथील मसुरे आंगणेवाडी  लघु पाटबंधारे योजनेच्या कोनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री अनिल परब, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक, पोलीस अधीक्षक दीक्षीतकुमार गेडाम, आंगणे कुंटुंबिय तसेच मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,  वरिष्ठ अधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा- वेळेच्या आधिच मुख्यमंत्री हजर : पत्रकारांना नाकारला प्रवेश...

22 कोटी 12 लाखाची मंजुरी आठ दिवसात

खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत करुन आंगणेवाडी  यात्रेसंबंधी माहिती दिली. तसेच या परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या आणि शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुमारे 22 कोटी 12 लाख खर्चाच्या लघु पाटबंधारे योजनेच्या कामाची प्रशासकीय मान्यता केवळ आठ दिवसात दिल्याचे सांगितले. मसुरे-आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजनेमुळे मसुरे, आंगणेवाडी व देऊळवाडा  गावातील लोकांना पाणी उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा- ब्रेकिंग - मुख्यमंत्र्यांसमोरच संतापले भास्कर जाधव ; खासदारांचा झटकला हात

5 कोटी रुपयांचा वाढीव निधीसाठी मागणी

या योजनेचा लाभ परिसरातील गावांना होण्यासाठी 5 कोटी रुपयांचा वाढीव निधी मिळावा, अशी मागणी खासदार श्री. राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तत्पूर्वी आंगणेवाडी येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray visit to Shri Bharadi Devi in ​​Anganwadi kokan marathi news