असा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chief Minister Uddhav Thackeray visits Konkan

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १७ आणि १८ फेब्रुवारीला सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

असा आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा...

सिंधुदूर्ग - शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १७ आणि १८ फेब्रुवारीला सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. १७ रोजी दुपारी १.५५ वाजता ते आंगणेवाडी यात्रेस भेट देणार असून १८ रोजी किल्ले सिंधुदुर्ग आणि त्यानंतर चिपी विमानतळाला भेट देऊन पाहणी करतील. या दरम्यान जिल्हा विकासाबाबत काही महत्वपूर्ण बैठका मुख्यमंत्री घेणार आहेत. 
   

१७ फेब्रुवारी - 

रत्नागिरी येथून दुपारी २.२५ वाजता हेलिकॉप्टरने मुख्यमंत्र्यांचे आंगणेवाडीत आगमन होणार आहे. तर ३.३५ वा. ते हेलिकॉप्टरने ओरोस येथे प्रयाण करतील. ३.४५ वाजता पोलीस परेड मैदान ओरोस, येथे त्यांचे आगमन होणार आहे. तेथून मोटारीने जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन होणार आहे. याठिकाणी ते सिंधुदुर्ग जिल्हा आढावा बैठक घेणार आहेत. तर सायंकाळी ५ वा.सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संदर्भात बैठक होणार आहे. ६ वा.सोयीनुसार ते मोटारीने कुडाळकडे प्रयाण करणार आहेत.
       

१८ फेब्रुवारी -

 सकाळी ८.४० वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण करणार असून सकाळी ९.०० वा. जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आगमन
९. वा. रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक करून १० वा. मोटारीने पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड, सिंधुदुर्गनगरीकडे प्रयाण, १०.०५ वा. पोलीस परेड ग्राऊंड हेलिपॅड, सिंधुदुर्गनगरी येथे आगमन १०.१० वा. हेलिकॉप्टरने टोपीवाला हायस्कूल ग्राऊंड,मालवणकडे प्रयाण, १०.२० वा. टोपीवाला हायस्कूल ग्राऊंड हेलिपॅड, मालवण येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार आहे. १०.२५ वा. मोटारीने मालवण जेटीकडे प्रयाण, १०.३५ वा. मालवण जेटी येथे आगमन, १०.४० वा. बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्याकडे प्रयाण, १०.५० वा. सिंधुदुर्ग किल्ला येथे आगमन, १०.५० वा. सिंधुदुर्ग किल्ला भेट, दुपारी ११.५० वा. बोटीने मालवण जेटीकडे प्रयाण, १२ वा. मालवण जेटी येथे आगमन १२.०५ वा. मोटारीने टोपीवाला हायस्कूल ग्राऊंड हेलिपॅड, मालवणकडे प्रयाण, १२.१५ वा. मोटारीने टोपीवाला हायस्कूल ग्राऊंड हेलिपॅड येथे आगमन
१२.२५ वा. हेलिकॉप्टरने चिपी विमानतळ कडे प्रयाण, १२.३० वा. चिपी विमानतळ येथे आगमन तर १२.३० वा. चिपी विमानतळ पाहणी व बैठक होणार आहे. दुपारी १ वा. ते हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.