मुख्यमंत्री उध्दव ठाकरे येत्या दोन दिवसांत कोकणचा दौरा करणार

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे येत्या दोन दिवसांत कोकणचा दौरा करणार

वैभववाडी (सिंधुदुर्ग): तौक्ते चक्रीवादळाची (Tauktar cyclone) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री (CM Udhhav Thackeray)उध्दव ठाकरे येत्या दोन तीन दिवसांत कोकणचा दौऱ्यावर येणार असल्याची माहीती पालकमंत्री उदय सामंत यांनी देतानाच निसर्ग वादळानिमित्त ( Nisarg cyclone) काढलेल्या शासननिर्णया प्रमाणेच शासन निर्णयाकरीता आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री सामंत हे आज वैभववाडी दौऱ्यावर आले होते. संपुर्ण तालुक्यातील नुकसानीची ते पाहणी करणार होते. परंतु त्यांना एक महत्वाची सभा असल्याने त्यांनी नाधवडे येथील नुकसानीची पाहणी केली. तेथेच त्यांनी तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत,प्रांतधिकारी वैशाली राजमाने,तहसिलदार रामदास झळके,संदेश पारकर,अतुल रावराणे,मंगेश लोके,दिगबंर पाटील,लक्ष्मण रावराणे,प्रदीप रावराणे,दिगबंर मांजरेकर,बंडु मुंडल्ये,सुधीर नकाशे,सरपंच सौ.नारकर,दादा पावसकर,राजेश तावडे,विजय तावडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, तौत्के चक्रीवादळाने सिंधुदुर्ग जिल्हयाचे मोठे नुकसान झाले आहे. घरे,गोठे,आणि इतर मालमत्तांसह आंबा, काजु, कोकम, सुपारी, नारळ आदी फळझाडांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हयावर आलेल्या संकटाचा सर्वतोपरी सामना केला जात आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सर्पकांत आहेत.परंतु येत्या दोन दिवसात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते स्वत सिंधुदुर्गात येणार आहेत.नुकसानीचा आढावा बैठक ते घेणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी जिल्हयाचा दौरा देखील ते करणार आहेत.

जिल्हयाप्रमाणे वैभववाडी तालुक्यात देखील वादळाने नुकसान अपरमित हानी झाली आहे.सुमारे साडेसातशे घरांचे नुकसान झाले आहे.महावितरण देखील नुकसान झाले असुन विजपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्थानिक टीम काम करीत आहेत.याशिवाय आणखी काही टीम मुख्यमंत्र्यांनी पाठविल्या आहेत.७० लोकांची टीम आज सायकांळी उशिरापर्यत तालुक्यात येईल.त्यामुळे येत्या दोन दिवसांत तालुक्यातील विज पुरवठा सुरळीत होईल.

जिल्हयातील फळबागायती आंबा,काजु,नारळ,कोकम,सुपारी,केळी या पिकांचे नुकसान झाले असुन कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू आहेत.निसर्ग वादळाप्रमाणे भरपाई शासननिर्णय व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.प्रशासनाकडुन भरपाई मिळण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.परंतु आम्ही शासनाकडुन मिळणाऱ्या मदतीवर अवलंबुन न राहता शिवसेनेच्या माध्यमातुन आपद्‌ग्रस्तांना तत्काळ मदत करण्यास सुरूवात करण्यात येत आहे.पत्रे,ताडपत्री,कौले आदी स्वरूपात मदत केली जात आहे.ज्या नळपाणी योजना विजेअभावी बंद आहेत.त्या जनरेटच्या सहाय्याने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com