अनोखी निसर्ग शाळा! नौका विहाराने मुले आनंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

children's school nature achra jamdul sindhudurg

आंबोलीच्या वर्षावनातील निसर्ग शाळेनंतर आचरा येथील दुसऱ्या निसर्ग शाळेत आचरा किनारपट्टी भागात चालणारी मासेमारी त्यावर आधारित जीवनशैली आणि समुद्राच्या लगतची जैवविविधता याबद्दल माहिती मुलांना या निसर्ग शाळेमधून देण्यात आली.

 

अनोखी निसर्ग शाळा! नौका विहाराने मुले आनंदी

आचरा (सिंधुदुर्ग) - आचरा खाडीतील नावेतून विहारणे, पक्षांचे किलबिलणे, कांदळवनाची उपयुक्तता, या आणि अशा अनेक निसर्गातील गोष्टींचा आनंद घेत मुले निसर्ग शाळेत हरखून गेली. 

जैवविविधतेने बहरलेल्या आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या भागात राहणाऱ्या स्थानिक मुलांना त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या परिसंस्थेची ओळख घडावी आणि निसर्ग भटंकतीमधून शिक्षण देऊन त्यांच्या मध्ये निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने "कोकणी रानमाणूस' प्रसाद गावडे आणि त्यांच्या टीमने आयोजीत केलेली दुसरी निसर्ग शाळा नुकतीच आचरा गावातील चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जामडूल बेटावर पार पडली. 

आंबोलीच्या वर्षावनातील निसर्ग शाळेनंतर आचरा येथील दुसऱ्या निसर्ग शाळेत आचरा किनारपट्टी भागात चालणारी मासेमारी त्यावर आधारित जीवनशैली आणि समुद्राच्या लगतची जैवविविधता याबद्दल माहिती मुलांना या निसर्ग शाळेमधून देण्यात आली. या शाळेसाठी आचरा, मालवण, देवगड, वेंगुर्ले आदी भागातील विद्यार्थी व त्यांचे पालक सहभागी झाले होते. आचरा सरपंच प्रणया टेमकर साहित्यिक, सुरेश ठाकुर, केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, आहारतज्ञ डॉ. गार्गी ओरसकर, डॉ. आदित्य शिंदे, विद्यानंद परब, पक्षी निरीक्षक चैतन्य आडवलकर, ऑलिसटर फर्नांडिस, वैदेही लेले, सुशांत सावंत आदी यावेळी उपस्थित होते. 

आचरा जामडूल येथील मच्छीमार व कांदळवन संवर्धनात मोलाची कामगिरी बजावणारे प्रमोद वाडेकर यांनी सर्वांना आचरा खाडी व कांदळवन सफर घडविताना कांदळवनाच्या विविध प्रजाती व त्यांचे महत्व विषद केले. आचरा रामेश्वर मंदिर आणि नागझरी तलाव आदी परिसराला देखील यावेळी भेट देण्यात आली. नागझरी तलावाच्या पाण्यावर होणारी वांयगणी भातशेती, देवमळा व देवभाताबद्दल यावेळी सुशांत सावंत यांनी माहिती दिली. 
 

सिंधुदुर्ग पर्यटन हे शाश्‍वत आणि निसर्गावर आधारित जीवनशैली या तत्वावर पुढे जायला हवे. यासाठी "कोकणी रानमाणस'च्या माध्यमातूनच आगामी काळात सिंधुदुर्गातील वेगवेगळ्या भागात अशा निसर्ग शाळेंचे आयोजन करणार आहे. 
- प्रसाद गावडे, "कोकणी रानमाणूस' 

संपादन - राहुल पाटील

Web Title: Childrens School Nature Achara Jamdul Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sindhudurg
go to top