अबब - एका मिरचीच्या झाडाला लागल्या 8 किलो मिरच्या.....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

कोणतेही रासायनिक खत न वापरता तुळस येथील मधुकर तेंडुलकर यांनी आपल्या परसबागेत 10 फुट उंचीचे मिरचीचे झाड वाढविले आहे.

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) : कोणतेही रासायनिक खत न वापरता तुळस येथील मधुकर तेंडुलकर यांनी आपल्या परसबागेत 10 फुट उंचीचे मिरचीचे झाड वाढविले आहे. या झाडाला सुमारे 7 ते 8 किलो मिरच्या लागल्या आहेत. रस्त्यालगतच हे झाड असल्याने येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वेधुन घेत आहेत.

तुळस-सावंतवाडा येथील रहिवासी तेंडुलकर हे आंबा बागेमध्ये काम करुन आपला उदरनिर्वाह करतात. आपल्या घराच्या परसबागेत त्यांनी विविध प्रकारची झाडे लावून त्याचे उत्पन्नही ते घेत असतात. उत्पन्न घेताना वेगवेगळे प्रयोग करणे ही त्यांची आवड आहे. 2019 मधील गणेश चतुर्थीमध्ये त्यांनी आपल्या परसबागेत मिरचीचे रोप लावले होते. त्या मिरचीच्या रोपासाठी कोणतेही रासायनिक खत न वापरता सागवान वृक्षाचे पाने जाळून त्यामध्ये गोवर मिक्स करुन त्याचे खत म्हणून वापर केले.

हेही वाचा- जूननंतर गुरख्यांसाठी विशेष रेल्वे गाडीची सुविधा चालू करावी : बाळ माने

या एप्रिलमध्ये मिरचीच्या झाडाची उंची तब्बल 10 फुट वाढली आहे. या झाडाला 7 ते 8 किलो मिरच्या लागल्या आहेत. यापूर्वी त्यांनी टॉमेटोचे साडेसहा फुट झाड वाढविले होते. निसर्गाने साथ दिल्याने मिरचीचे झाड 10 फुट वाढविणे शक्य झाल्याचे श्री. तेंडुलकर यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chili Experiments in scales 8 kg of chillies per plant