व्वा रे पट्ट्या! परसबागेतील `हा` प्रयोग तरी बघा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

उत्पन्न घेताना वेगवेगळे प्रयोग करणे ही त्यांची आवड आहे. 2019 मधील गणेश चतुर्थीमध्ये त्यांनी परसबागेत मिरचीचे रोप लावले होते.

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - कोणतेही रासायनिक खत न वापरता तुळस येथील मधुकर तेंडुलकर यांनी परसबागेत 10 फूट उंचीचे मिरचीचे झाड वाढविले आहे. या झाडाला सुमारे 7 ते 8 किलोमिरच्या लागल्या आहेत. रस्त्यालगतच हे झाड असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

तुळस-सावंतवाडा येथील रहिवासी तेंडुलकर हे आंबा बागेमध्ये काम करुन उदरनिर्वाह करतात. आपल्या घराच्या परसबागेत त्यांनी विविध प्रकारची झाडे लावून त्याचे उत्पन्नही ते घेत असतात. उत्पन्न घेताना वेगवेगळे प्रयोग करणे ही त्यांची आवड आहे. 2019 मधील गणेश चतुर्थीमध्ये त्यांनी परसबागेत मिरचीचे रोप लावले होते.

त्या मिरचीच्या रोपासाठी कोणतेही रासायनिक खत न वापरता सागवान वृक्षाचे पाने जाळून त्यामध्ये गोवर मिक्‍स करून त्याचे खत म्हणून वापर केले. या एप्रिलमध्ये मिरचीच्या झाडाची उंची तब्बल 10 फूट वाढली आहे. या झाडाला 7 ते 8 किलो मिरच्या लागल्या आहेत. यापूर्वी त्यांनी टॉमेटोचे साडेसहा फूट झाड वाढविले होते. निसर्गाने साथ दिल्याने मिरचीचे झाड 10 फूट वाढविणे शक्‍य झाल्याचे श्री. तेंडुलकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chili production tulas konkan sindhudurg