मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना दिले 'हे' वचन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chipi Airport starting on 1st May Maharashtra Day kokan marathi news

चिपी विमानतळ 1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केली..

मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना दिले 'हे' वचन..

परूळे (सिंधुदूर्ग) :  चिपी विमानतळ 1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केली. हे आश्‍वासन नव्हे तर वचन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री ठाकरे हे दोन दिवसाच्या जिल्हा दौऱ्यावर होते. काल (ता. 17) त्यांनी आंगणेवाडी भराडीचे दर्शन घेतल्यानंतर विविध विकासात्मक आढावा घेतला. 

आज सकाळी ओरोस येथे विकासात्मक आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी सिंधुदुर्गचे वैभव जे लवकरच उदयास येत आहे, अशा चिपी विमानतळाला भेट देऊन पाहणी केली. धावपट्टीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री ऍड. अनिल परब, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, आमदार दिपक केसरकर, सीईओ डॉ. पी. अनबलगन, श्री. मलिकनेर, सोनजे राठोड, प्रशांत पाडाळकर, परशुराम करावडे, प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर, किरण कुमार तसेच शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब

हेही वाचा- मुख्यमंत्री ठाकरेंची शिवराजेश्‍वर मंदिरास भेट

जिल्हाप्रमुख संजय पडते, युवानेते संदेश पारकर, गितेश राऊत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूखानोलकर, अभय शिरसाट, मंदार शिरसाट, राजन नाईक, संदीप म्हाडेश्‍वर, बाबुराव धुरी, गितेश राऊत, संदेश निकम, सुनील डूबळे, गणेश नाईक, आबा कोंडस्कर, पंकज शिरसाट आदी उपस्थित होते. बैठकीत विमानतळाचा आढावा घेतल्यानंतर ते धावत्या दौऱ्यात पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला सामोर गेले. 

हेही वाचा- नाणार प्रकल्प होणार नाहीच- मुख्यमंत्र्यांचा त्या जाहिरातीवर खुलासा

काही त्रुटी लवकरच पूर्ण! 
चिपी विमानतळ येत्या 1 मेस कार्यान्वित होणार आहे, हे आश्‍वासन नाही तर वचन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चिपी विमानतळाला आवश्‍यक असलेल्या पाणी, वीज, बीएसएनएल कनेक्‍शन, अशी कामे झाली असून 1 मे दिवशी विमानतळ सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. ज्या दोन-तीन समस्या होत्या त्या दरम्यानच्या कालावधीत मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट केले. चिपी विमानतळावर श्री. ठाकरे यांचे साडेबारा वाजता आगमन झाले. त्यानंतर 1:35 ला ते मुंबईकडे रवाना झाले.  

 
 

टॅग्स :Sindhudurg