

भोसले म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला 2011 पासून सुरू झाली. मी स्वतः या मार्गाची पाहणी केली; परंतु व्हॅनिटी वाहनाचा वापर केला नाही. चिपळूणच्या पुलाचे काम 50 टक्के झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करत आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण केले जाईल. चिपळूणमधील पुलावरील गर्डर कोसळल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला 50 लाखाचा दंड केला असून आराखडा बनवणाऱ्या अभियंत्याला 20 लाखाचा दंड केला आहे.
जानेवारी 2026 अखेर हा पूल पूर्ण होईल. या महामार्गाच्या दर्जाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत; परंतु दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही तरी क्वालिटी कंट्रोल विभागाकडून याची चौकशी केली जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.