Chiplun flyover latest update
esakal
चिपळूण : शहराच्या वाहतुकीला दिलासा देणाऱ्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी अंतिम टप्प्यातील जोडरस्ते आणि भरावाचे काम गणेशोत्सवामुळे तात्पुरते थांबवण्यात आले (Ganeshotsav Traffic Update) आहे. अवघ्या ५० मीटरच्या भरावासह काही कामे पूर्ण झाल्यानंतरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला होणार आहे.