Dabhol creek fish market latest news
esakal
चिपळूण : ताजा खाडीचा तांबोशी घ्या, जिवंत कोळंबी आहे, अशा हाका मारत सध्या दाभोळ आणि वाशिष्ठी खाडीतील माशांची विक्री सुरू आहे. ५०० ते ७०० रुपये किलोदराने माशांची किरकोळ विक्री केली जात (Dabhol creek fish market latest news) आहे. बाजारात समुद्रातील मासळीची टंचाई निर्माण झाली असताना खाडीतील माशांना प्रचंड भाव आला आहे. वाशिष्ठी आणि दाभोळ खाडीमध्ये सध्या विविध प्रकारची दर्जेदार मासळी मुबलक प्रमाणात मिळू लागली आहे. त्यामुळे मासळी बाजारात खाडीच्या माशांनी खवय्यांची मागणी पूर्ण केली असून, स्थानिक मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.