Chiplun Guhagar MIDC Approved : रद्द झालेला 'ड्रीम प्रोजेक्ट' पुन्हा मार्गी लागणार! चिपळूण-गुहागर सीमेवर उभारली जाणार नवीन MIDC; उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

New MIDC on Chiplun Guhagar border : चिपळूण-गुहागर सीमेवर नवीन एमआयडीसी उभारण्यास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्यता दिली. आमदार भास्कर जाधव सुचवतील त्या ठिकाणी औद्योगिक वसाहत उभारण्याचे आश्वासन दिल्याने परिसराच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
Uday Samant approves new MIDC in Ratnagiri

Uday Samant approves new MIDC in Ratnagiri

esakal

Updated on: 

चिपळूण : चिपळूण आणि गुहागर तालुक्यांच्या सीमेवर नवीन औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) उभारण्याच्या प्रस्तावाला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मान्यता दिली आहे. ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता. २७) सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आमदार भास्कर जाधव सुचवतील त्या ठिकाणी ही एमआयडीसी उभारली (Chiplun Guhagar industrial development Project) जाईल, असे आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले.

Loading content, please wait...