चिपळूण - कराड मार्ग, आंबा घाटात वाहतुक सुरु

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

रत्नागिरी - अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे  रत्नागिरीकडे येणारा भाजीपाला, दूध, इंधन, गॅस सिलिंडरसह विविध आवश्यक वस्तूंची वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी चिपळूण - कराड या मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. कराडमार्गे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरु होत आहे; मात्र पुरवठा कमी असल्याने रत्नागिरीत भाजीचे दर वधारले आहेत. दरम्यान आंबा घाटातही वाहतूक सुरू झाली आहे. 

शुक्रवारी (ता. 9) सकाळी इंधनासह दुधाच्या काही गाड्या रत्नागिरीत दाखल झाल्या होत्या. शनिवारी सकाळी आंबा घाटातून एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. पाटण येथील पूर ओसरल्यामुळे चिपळूण - कराड मार्ग सुरळीत झाला आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्र जलमय झाला असून आंबा घाटातील रस्त्याला भेगा पडल्यामुळे वाहतुकीत गेले सहा दिवस अडथळ्यात सुरु आहे. आंब्यातून अवजड वाहने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे तीन दिवस लाखो लिटर दूध रत्नागिरी आले नव्हते. पेट्रोल - डिझेलचे ट्रक अडकून पडल्यामुळे एसटी सेवाही विस्कळीत झाली. दूधाचा तुटवडा जाणवत होता. भाजीपाला रत्नागिरीत न आल्यामुळे स्थानिक स्तरावरील प्राप्त भाजीचे दर गगनाला भिडलेले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chiplun - Karad highway, Amba Ghat way starts