Koyna hydropower generation water management
esakal
चिपळूण : कोयना धरणातील पाण्यावरील वीजनिर्मितीचे योग्य नियोजन केल्यास चिपळूण शहरासह औद्योगिक वसाहती आणि वाशिष्टी नदीवर अवलंबून असलेल्या गावांचा उन्हाळ्यातील पाणीप्रश्न सुटू (Chiplun summer drinking water shortage) शकतो. राज्यात मार्च आणि एप्रिलमध्ये विजेची मागणी वाढल्यानंतर कोयना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती केली जाते. या दोन महिन्यांत वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यापैकी सुमारे ५० टक्के पाणी खर्च होते. त्यामुळे वीजनिर्मितीचे वेळापत्रक बदलून पाण्याचा वापर मे अखेरपर्यंत नियोजनबद्ध केले पाहिजे, अशी मागणी होत आहे.