Chiplun Flood Live - चिपळूणात रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात

शहरातील पाण्याची पातळी 3 फुटाने कमी झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
Chiplun Flood Live - चिपळूणात रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात
Updated on

चिपळूण : पुरात अडकलेल्या चिपळुणातील (chiolun flood live) नागरिकांना वाचवण्यासाठी आज सकाळपासून जोमाने मदतकार्य (rescue operation) सुरू झाले आहे. शासकीय यंत्रणेसह राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मदत कार्यात मग्न आहेत. (chiplun live news) नागरिकांना बोटींच्या मदतीने पुराच्या पाण्यातून बाहेर काढले जात आहे. शहरातील पाण्याची पातळी 3 फुटाने कमी झाल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. मोबाईल सेवा आणि वीज पुरवठा खंडित असल्यामुळे लोक अजूनही संपर्काच्या बाहेर आहेत त्यामुळे प्रत्येकजण काळजीत आहे. (konkan rain update)

शहरातील नागरिकांना २४ तासात पुराच्या पाण्यात काढावे लागले. शुक्रवारी सकाळी पाणी ओसारण्यास सुरुवात झाली होती. मात्र कोयनेतून विसर्ग सुरू करण्यात आल्याने त्याचा परिणाम वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळी वर झाला. NDRF सह नेव्ही, आर्मीची पथके 24 तासानंतर चिपळूनकडे रवाना झाली. गुरुवारी रात्रीपासूनच रेस्क्यू ऑपेशनला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातील पावसामुळे गुरुवारी पहाटेपासून चिपळूणमध्ये पुरजन्यस्थिती निर्माण झाली. कधी नव्हे तो चिपळूण, खेर्डी आणि आजूबाजूच्या परिसर पाण्याने व्यापला गेला.

Chiplun Flood Live - चिपळूणात रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात
Chiplun Flood live - पुराचे पाणी ओसारण्यास सुरुवात

परिस्थिती होणार हा अंदाज असतानाही मदत पथके खूप उशिरा चिपळूणच्या दिशेने निघाली. वाटेत अनेक नैसर्गिक अडचणी आल्या आणि NDRF 16 तासानंतर रात्री 8 च्या दरम्यान चिपळूणला पोचले. जितकी शक्य तितकी मदत NDRF ने केली. हेलपिंग हँड, रत्नदुर्ग मौंटेनिअर्स, कोल्हापूर येथील व्हाईट आर्मी ग्रुप सह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगडातील काही स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चिपळूणला पोहोचले आहेत. अडचणीतील लोकांना बाहेर काढण्यास मदत केली जात आहे. जयगड, दापोली, गुहागर येथून अनेक मच्छीमारी नौकांनी चिपळूनमध्ये आपल्या बोटी नेल्या आहेत. शुक्रवारी सकाळपासून खऱ्या अर्थाने मदत कार्याला वेग आला आहे. सकाळी चिपळूनमधील पावसाचा जोर ओसरला होता. गोवळकोट रस्त्यावरील पुराचे पाणी साधारण 3 फुटाने कमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jaigad Port Gas Ship
Mumbai Goa highway construction update
Ratnagiri Padve bauxite mining latest news
Engineer From Malvan Dies in Bhutan Bike Crash During Trip Funeral Held Locally After Tragic Accident
Marathi News Esakal
www.esakal.com