esakal | Chiplun : चिपळूणात प्रांत कार्यालयावर मोर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

chiplun

Chiplun : चिपळूणात प्रांत कार्यालयावर मोर्चा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाचे होणारे चौपदरीकरण पूर्णत्वास जात नसल्याने नागरिकांना विविध समस्या भेडसावत आहेत. या प्रश्नासंदर्भात मंगळवारी कोकण समन्वय समितीने निषेध करत मोर्चा काढला. शहरातील बहादूरशेख नाका येथून प्रारंभ झालेल्या या मोर्चादरम्यान काळे झेंडे घेऊन हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला.

या वेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे होत असून पावसाळ्यात महामार्ग खड्डेमुक्त व्हावा, धोकादायक वळणे व घाटमार्ग शक्य तितके सोपे करावेत, महामार्गाच्या भरावासाठी डोंगर पोखरु नये, हायवेचे जंक्शन मुख्य रस्त्यावर येऊन मिळत असल्याने अशा ठिकाणी सुरक्षिततेसाठी ब्रिज, अंडरपास सीसची व्यवस्था हवी. लोटे परशुराम, पोलादपूर, संगमेश्वर येथील बाजारपेठेचा प्रश्न सोडवावा.

सुरक्षितेच्या दृष्टीने शक्य असतील ते सर्व बदल केले जावेत. यासाठी एक समिती स्थापन करावी, अशा मागण्या केल्या आहेत. या वेळी श्रीपाद चव्हाण, शिरीष काटकर, मिलिंद कापडी, राम रेडीज, संजय तांबडे, तुषार गोखले, प्रसाद सागवेकर, रूपेश घाग, प्रवीण पाकळे, अजय महाडीक, शरद शिगवण, जगदीश वाघुळदे, अमोल शिरधनकर, निखिल पाटील, सुधीर भोसले, बुवा चव्हाण, निर्मला जाधव, वैशाली विचारे, प्राजक्ता सरफरे आदी उपस्थित होते.

loading image
go to top