Mumbai-Goa Highway Traffic Crisis in Chiplun:
esakal
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूण शहरातील वाहतुकीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले (Chiplun Flyover Demand) आहे. पागनाका चौकासह शहरातील विविध ठिकाणी निर्माण झालेली वाहतूक कोंडी, जोडरस्त्यांची समस्या आणि महामार्गावरील वाढती वर्दळ यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः गणेशोत्सव, सणासुदीच्या काळात चाकरमान्यांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आता चिपळूण प्रांत कार्यालय ते कापसाळ विश्रामगृह या मार्गावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.