बर्ड फ्लूच्या सावटामुळे अनेकांनी कोंबडीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, मटणाच्या मागणीत वाढ झाली आहे.
चिपळूण : धुळवडीच्या दिवशी तिखट जेवणावळीचा बेत आखलेल्या अनेक मांसाहारींना मटण खरेदीसाठी प्रतिकिलो ८०० रुपये मोजावे लागले. बर्ड फ्लूच्या (Bird Flu) साथीमुळे चिकण ऐवजी मटणाच्या खरेदीसाठी दुकानाबाहेर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. शेळीपालनाऐवजी फळ आणि पालेभाज्यांची पिके घेण्याकडे वाढलेला कल, शेळीपालनात झालेली घट, प्रजनन कालावधीपूर्वीच बोकड आणि मेंढ्यांची होणारी विक्री, मागणीच्या तुलनेत कमी झालेला पुरवठा तसेच काही भागात पसरलेली बर्ड फ्लूची साथ अशा विविध कारणांमुळे मटणाचे दर वाढत आहेत.