चिपळूण : गेले आठ दिवस कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारपासून विश्रांती घेतल्यानंतर बुधवारपासून अर्धवट राहिलेल्या कामांच्या ठिकाणी यंत्रसामग्री धडधड पुन्हा सुरू झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटात (Parashuram Ghat) गॅबियन वॉलसह लोखंडी जाळी बसवण्याचे शिल्लक राहिलेले काम आणि शहरातील नद्यांमधील गाळ उपसाही सुरू झाला आहे. अंदाज घेत हळूहळू शेताच्या कामांनाही शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.