Chiplun Politics : महाविकास आघाडीत उमेदवारीवरून यादवी; राष्ट्रवादीच्या 'त्या' जागेवर शिवसेनेचा डोळा

Chiplun Politics : चिपळूणमधून उमेदवारी मिळावी यासाठी रमेश कदम यांचे वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Chiplun Politics
Chiplun Politicsesakal
Updated on
Summary

भास्कर जाधव आणि रमेश कदम यांनी एकदिलाने प्रशांत यादव यांचे काम केले तर या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवाराची सरशी होऊ शकतो.

चिपळूण : महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) चिपळूणच्या जागेवरून शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात स्पर्धा सुरू आहे. आघाडीच्या जागा वाटपात चिपळूणची जागा राष्ट्रवादीकडे आहे. परंतु शिवसेनेच्या इच्छुकांचा चिपळूणच्या जागेवर डोळा आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला १८ हजाराचे मताधिक्य मिळाल्यानंतर शिवसेनेच्या इच्छुकांना चिपळूणची जागा सुरक्षित वाटत आहे. अनेक इच्छुक उमेदवारी मिळवण्यासाठी रांगेत उभे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com