चिपळूण : संरक्षण कवच; वन्यजीवांचा हक्कच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अलीकडेच वाढत्या प्रमाणात गैरकृत्य घडू लागली आहेत.

चिपळूण : संरक्षण कवच; वन्यजीवांचा हक्कच

चिपळूण: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अलीकडेच वाढत्या प्रमाणात गैरकृत्य घडू लागली आहेत. या प्रकल्पात वाघांबरोबर इतर  जैवविविधतेचे  संरक्षण  व  संवर्धन व्हावे, वने सुरक्षित  राहावीत,  यासाठी  विशेष  व्याघ्र  संरक्षण  दल (स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स)ची अत्यंत गरज  आहे. विशेष  व्याघ्र  संरक्षण दल स्थापन करण्याची मागणी राज्य व केंद्र सरकारकडे याआधी केलेली असून, २०१४ पासून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. प्रकल्पाच्या संरक्षणासाठी स्वतःचे हक्काचे संरक्षण कवच मिळाले तर कर्मचारी त्यांचे कामविना अडथळा करू शकतील.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेल्या राखीव क्षेत्रात अनेक वेळा चोरटी शिकारी, बेकायदेशीर वृक्षतोड, सह्याद्रीच्या गाभाक्षेत्रात बंदूक घेऊन प्रवेश करणे, वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्याची चोरी करणे, औषधी वनस्पतींची तस्करी करणे, विनापरवाना निवास करणे, वणवे लावणे अशा घटना घडत आहेत. अलिकडे देवरूख, संगमेश्वर, चिपळूण, खेड येथे शिकारी करणारे तसेच बिबट्याच्या कातड्यांची तस्करी करणाऱ्यांना बंदुक आणि इतर मुद्देमालासह पकडण्यात आले. त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांच्या रक्षणाचा मोठा विषय समोर आला आहे. राज्यातील इतर प्रकल्पात असे दल केंद्र सरकारने स्थापन केले आहे. तसे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थापन झाल्यास गैरप्रकाराला आळा घालणे शक्य आहे.

जंगलात रात्रंदिवस गस्त घालणे, इतकेच काम

या दलाला वन्यजीव विभागाची आर्मी म्हणता येईल. वाघांच्या शिकाराली आळा घालणे, जंगल सुरक्षित ठेवण्याचे प्रमुख कार्य करावे लागते. या दलाला केंद्र सरकारची परवानगी असते. त्यामध्ये ११८ तरुणांचा समावेश असतो. एक सहायक वनसंरक्षक, दोन परिक्षेत्र वनाधिकारी आणि उर्वरित वनरक्षकांचा यामध्ये समावेश असते. वन्यजीव आणि जंगलांचे रक्षण करणे, असा या दलाचा उद्देश असतो. मिलिटरीसारखा गणवेश आणि आधुनिक शस्त्र या दलात असतात. या दलाचा इतर कोणत्याही कामासाठी वापर करता येत नाही. केवळ जंगलात रात्रंदिवस गस्त घालणे एवढेच काम या दलातील कर्मचाऱ्यांना करावा लागतो.

सामूहिकरीत्या प्रयत्न हवेत

सातारा येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी विशेष व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याची मागणी राज्य व केंद्र सरकारकडे केली आहे. २०१४ पासून त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. सामूहिकरित्या प्रयत्न झाल्यास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी स्पेशल व्याघ्र संरक्षण दल स्थाप होऊ शकतो.

Web Title: Chiplun Protective Shield Wildlife Rights

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top