

चिपळूण : कोकणातील काजू उत्पादक व्यावसायिकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ३०० हून अधिक व्यावसायिकांना त्याचा लाभ मिळेल, अशी माहिती काजू प्रक्रिया उद्योजक संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विवेक बारगीर यांनी 'सकाळ'ला दिली. शासनाच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे बारगीर यांनी सांगितले.
कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देणार आहे. यासाठी राज्य शासनातर्फे व्याज सवलत योजना तयार करण्यात येईल, तसेच ओल्या काजूगराला अधिक किंमत मिळत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर ओला काजूगर काढण्यासाठी यंत्र लुधियानावरून मागविण्यात येणार आहे. हे यंत्र मागविल्यावर ओल्या काजूगराचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणारे काजूचे वाण विकसित करण्याच्या सूचना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. काजू प्रक्रिया उद्योजक संघटनेचे अध्यक्ष बारगीर म्हणाले, की काजू प्रक्रिया उद्योग करणाऱ्याला कच्चा माल मोठ्या प्रमाणात साठवावा लागतो. त्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. सरकारने सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध केल्यास त्याचा व्यावसायिकांना निश्चित फायदा होईल.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. त्याचाच भाग म्हणून कोकणच्या शाश्वत विकासासाठी कोकणात मत्स्यव्यवसाय, फळबाग, दुग्धव्यवसायासह पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करीत आहे, याचा पुरावा म्हणजे हा निर्णय आहे.
- शेखर निकम, आमदार, चिपळूण
गुहागर तालुक्यात १३ काजू प्रक्रिया उद्योग सुरू आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळेल. रत्नागिरी जिल्ह्यात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. सरकारने सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना राबविल्याने काजू लागवडीचे क्षेत्र वाढेल.
- संजय गाडगीळ, वेळंब
हे फायदे मिळणार
* अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध
* ओला काजूगर काढण्यासाठी यंत्र
* लुधियानावरून आणण्याचा निर्णय
* भांडवल उभारणीसाठी सवलत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.