चिरायू भव

चिरायू भव

(२८ मे टुडे ३)

चिरायू भव ....... लोगो


-rat३p२.jpg-
२४M८७४७३
डॉ. श्रीविजय फडके

मुले ही देवाघरची फुले असं नेहमीच म्हटलं जातं. निरागस आणि नाजूक बालकांना कुठे ओरखडा जरी आला तरी पालकांना आणि नातेवाईकांना धस्स होणं स्वाभाविक आहे. साहजिकच बालकांमधील मेंदूचे किंवा मज्जारज्जूचे आजार हे पालकांच्या मनात धडकी भरवणारे असतात.

- डॉ. श्रीविजय फडके
मेंदूशल्यचिकित्सक
(shreemusic@gmail.com)

---------

मुले ही देवाघरची फुले


आजकाल गरोदरपणात केल्या जाणाऱ्‍या सोनोग्राफीमुळे पूर्वी दिसणारे अनेक मेंदूचे व मज्जातंतूचे आजार हे २० आठवड्याच्या आधीच निदान होऊन बऱ्याचदा गर्भपात केला जातो. त्यामुळे ९० च्या दशकाच्या मानाने आज मेंदू व मज्जारज्जूचे आजार खूपच कमी प्रमाणात आढळतात. इतके असूनही हे आजार आढळतच नाहीत असे नाही. काहीवेळा सोनोग्राफीमध्ये सौम्य आजार दिसत नाहीत, तसेच सोनोग्राफी करणाऱ्‍या डॉक्टरांच्या कौशल्यावरही आजाराचे निदान अवलंबून असते. सोनोग्राफी कित्येक महिला टाळतात. आडगावात राहणाऱ्‍या महिलांना सोनोग्राफी नेहमी उपलब्ध असतेच असे नाही. त्यामुळे माझ्याकडे येणारे बरेचसे नवजात बालकांमध्ये मेंदूचे आजार हे आडगावात राहणाऱ्‍या पालकांच्या मुलांमध्ये आढळतात. मेंदूच्या आजरांमध्ये प्रामुख्याने मेंदूतील पाणी जास्त असणे म्हणजेच हायड्रोसेफॅलस, बाळ जनमाच्या वेळी गुदमरल्याने मेंदूत होणारा रक्तस्त्राव, जनमाच्या वेळी मेंदूला रक्तपुरवठा व ऑक्सिजन कमी प्रमाणात गेल्याने मेंदूला होणारी इजा, काही वेळा कवटीचा भाग डोक्याच्या बाहेर असणे अशा प्रकारचे आजार बघायला मिळतात. मज्जारजूच्या आजारांमध्ये प्रामुख्याने स्पायना बायफिडा म्हणजेच मज्जारजूचे आवरण व्यवस्थित न बनणे व त्याचे अनेक प्रकार हा आजार बघायला मिळतो. त्याचबरोबर मज्जारजू अर्धवट बनणे, दोन मज्जारजू असणे वैगरे आजारही दिसून येतात.
या आजारांसाठी प्रत्येक वेळी ऑपरेशन लागतेच असे नाही. मात्र मेंदूचा भाग बाहेर असणे (एनसीफॅलोसिल) तसेच ओपन स्पायना बायफिडा हे आजार असल्यास मात्र अगदी अत्यावश्यक परिस्थितीत २४ तासाच्या आत सर्जरी करणे गरजेचे शकते. अगदी नवजात बालकांमध्ये, याच्या जन्माचा एक दिवसही पूर्ण झालेला नाही, अशा बालकांमध्ये सर्व प्रकरची रिस्क घेऊन केलेले ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतरचा अत्यानंद मी अनुभवला आहे.
नवजात बालकांवरील न्युरोसर्जिकल शस्त्रक्रिया ही अतिशय अवघड व अतिशय कौशल्यपूर्ण असते. सर्जन प्रमाणेच भूलतज्ज्ञांचीही कसोटी यामध्ये लागते. बालकाच्या शरीराचा, नाजूक अवयवांचा पूर्ण विचार करून लवकरात लवकर अत्यंत नाजूकपणे ही सर्जरी करणे आवश्यक असते. हायड्रोसिफॅलस आपल्याला थोडासा वेळ देते. यामध्ये दहा-बारा दिवसांचा किंवा अगदी महिन्याचा वेळ घेऊन हे ऑपरेशन करणे शक्य होते, अशा ऑपरेशनमध्ये टाकला जाणारा पाईप किंवा शंट हा बाळाच्या आकाराचा विचारा करून टाकला जातो व बालकाचा आकार जसा जसा वाढत जातो, तस तसा तो कमी करून ते ऑपरेशन परत परत करण्याची गरज भासू शकते. बालकामध्ये रोगप्रतिकारकक्षमता ही अत्यंत कमी असल्याने ऑपरेशननंतर त्यांना अनेक दिवस काचपेटीत ठेवावे लागू शकते. तसेच त्यांची अत्यंत कौशल्यपूर्णपणे काळजी घेणे आवश्यक असते. यामध्ये बालरोग विकार तज्ज्ञांचा वाटाही अत्यंत महत्वाचा असतो. म्हणजेच बालकांमधील मेंदू व मणक्याचे विकार हे एका खास सुपर स्पेशालिटी सेंटर सांघिक पद्धतीनेच योग्यरित्या हाताळले जाऊ शकतात.
-----------
(डॉ. श्रीविजय फडके हे चिरायु हॉस्पिटल येथे मेंदूशल्यचिकित्सक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com