

Phansad Bird Count 2026: A Unique Citizen Science Initiative in Raigad
Sakal
पाली : निसर्गाचा अनमोल वारसा लाभलेल्या रायगड जिल्ह्यातील **फणसाड वन्यजीव अभयारण्यात आगामी १५ ते १७ मे २०२६ दरम्यान एका विशेष 'पक्षी गणना' मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. केवळ पक्षीनिरीक्षणच नाही, तर प्रत्यक्ष संवर्धन विज्ञानात सहभागी होण्याची ही दुर्मिळ संधी पक्षीमित्रांना मिळणार आहे.