दादागिरी करणाऱ्या पोलिसांनाच खेचले ठाण्यात 

Citizens angry at police at Chowke konkan sindhudurg
Citizens angry at police at Chowke konkan sindhudurg
Updated on

मालवण (सिंधुदुर्ग) - संकेश्‍वर पोलिस ठाण्यात आलेल्या एका साध्या तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी संकेश्‍वर पोलिसांनी चौके (ता. मालवण) गावात जात दादागिरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. ओळखपत्र, वॉरंट नसताना चौकेतील चिरेखाणीवर येऊन एका कामगाराला त्यांनी उचलले. ग्रामस्थांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता न जुमानता निसटलेल्या संकेश्‍वर पोलिसांची खासगी गाडी ग्रामस्थांनी वाटेत अडवून त्यांना थेट येथील पोलिस ठाण्यात आणले. चौकशीत ते पोलिसच असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यांच्या दादागिरीबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. 

कर्नाटकातील संकेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इसमाने लॉकडाऊनमध्ये आपल्या पत्नीच्या आजारपणावेळी दुसऱ्या एका व्यक्तीकडून ऊस तोडण्याच्या कामासाठी 60 हजार रुपये आगाऊ घेतले होते. मात्र त्या व्यक्तीने पैसे परत न करता ही व्यक्ती तालुक्‍यातील चौके येथील चिरेखाणीवर आली होती. त्याच्याकडून उसने दिलेले पैसे मिळत संकेश्‍वरमधील व्यक्तीने तेथील पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार ही व्यक्ती चौकेत असल्याचे समजताच एका पोलिसाला घेऊन संकेश्‍वरमधील 4 ते 5 जण खासगी गाडीने चौके गावात आले. त्याठिकाणी खाणीवर जाऊन त्यांनी तेथील कामगाराला ताब्यात घेतले आणि त्याच्या कानशिलात मारली. हा प्रकार पाहून स्थानिकांनी त्यांना पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवण्याची मागणी केली; मात्र त्यांच्याकडे ओळखपत्र अथवा अन्य कोणतेही कागदपत्र नव्हती. 

त्यामुळे त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणाचेही न ऐकता ते निघून गेले. त्यामुळे आंबेरी रस्त्यावर ही गाडी अडवण्यात आली. आणि तेथून येथील पोलिस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत ते पोलिसच असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यांनी तालुक्‍याच्या हद्दीत कारवाई करताना स्थानिक पोलिसांना कल्पना देणे आवश्‍यक होते. त्यामुळे आरोपी बाबत त्यांच्याकडे वॉरंट नसल्याने त्याला ताब्यात देणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

शिवसेनेकडून निषेध 
दरम्यान, त्या कामगाराने आपण पैसे घेतल्याचे मान्य करीत हे पैसे परत करण्यासाठी आपल्या गावी राहत असलेल्या भावाकडे पाठवल्याचे सांगितले. त्यानंतर हे प्रकरण मिटवण्यात आले; मात्र कर्नाटक पोलिसांनी पैशाच्या वसुलीसाठी दाखवलेल्या या दबंगगिरीचा शिवसेनेने निषेध केला आहे. हे कर्नाटक पोलिस होते की वसुली अधिकारी? असा प्रश्न उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे यांनी उपस्थित केला. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगरसेवक मंदार केणी, नांदरुख सरपंच दिनेश चव्हाण, समीर पाटकर, प्रशांत नाईक, गणेश भगत आदी उपस्थित होते.  

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com