पाताळगंगा बंधाऱ्यातील जॅकवेलमधील कचरा काढण्याचे काम सुरू

लक्ष्मण डूबे 
शनिवार, 23 जून 2018

रसायनी (रायगड) : रसायनी परिसरात गुरुवारी झालेल्या जोरदार पावसात पाताळगंगा नदीला आलेल्या पुरात नदीवरील एमआयडीसीच्या बंधार्यात जलपर्णी आणि उदंचन केंद्रातील जॅकवेल मध्ये कचरा येऊन अडकल्याने एमआयडीसी तर्फे केल्या जाणार्या पाणी पुरवठ्यावर गुरुवारी रात्रीपासून परिणाम झाला आहे. कारखाने आणि गावांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने कारखानदांर व नागरिकांना पाणी टंचाईला तोड द्यावे लागत आहे. तर जॅकवेल मधील कचरा काढण्याचे काम शनिवार (ता 23) रोजी सुरू केले आहे. 

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दितील पाताळगंगा नदीच्या तिरावरील एमआयडीसीच्या या बंधाऱ्यातुन अशुध्द पाणी उचलुन पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कैरे आणि मोहोपाडा येथील जलशुध्दीकरण केंद्रात शुध्दीकरण करण्यात येत आहे. मोहोपाडा जलशुध्दीकरण केंद्रातुन रसायनीतील एचओसी, एचआयएल, लोना इंडस्ट्रीज आदी रसायनीतील कारखाने आणि वासांबे मोहोपाडा, चांभार्ली, बारवाई, पोंयजे, पोसरी, वावेघर, तुराडे, सावळे, भिंगार, कोन, पळस्पे, कसळखंड आदी ग्रामपंचायतीच्या हद्दितील पस्तीस गावांना तसेच कैरे येथील जलशुध्दीकरण केंद्रातुन पाताळगंगा अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कारखाने आणि वडगाव, कराडे खुर्द, चावणे, जांभिवली या ग्रामपंचायतीच्या हद्दितील तेरा गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 

दरम्यान काल पाताळगंगा नदीला आलेल्या पुरात नदीतील जलपर्णी वाहुन येऊन बंधाऱ्यात आडकली आहे. तसेच जँकवेल मध्ये कचरा जाऊन बसला आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्रांना होणारा अशुध्द पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. परिणामी  कैरे आणि मोहोपाडा येथील कारखाने आणि गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. कारखाने आणि गावातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याने पाणी टंचाई तोड द्यावे लागत आहे. 

जलपर्णी काढण्याचे काम सुरू आहे, तर जॅकवेल मधील कचरा काढण्याचे पाणबुडे पथक आज शनिवार सुरू केले आहे. पाणी पुरवठा पुन्हा पुर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असे एमआयडीसीचे साहाय्यक अभियंता आशोक कवळे यांनी सांगितले. 
 
Web Title: cleaning of jack well of patalganga water canol