
प्रजासत्ताक दिनी जबाबदारीची जाणीव ठेवत स्वच्छता मोहीम आखण्यात आली. या मोहिमेला सार्थ हाक देत आणि फिनोलेक्स ऍकॅडमीच्या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी सकाळी 6.30 ते 8.30 पर्यंत मोहीम पूर्ण केली.
जिद्दी माऊंटेनिरिंगकडून रत्नदुर्गची स्वच्छता
रत्नागिरी- जिद्दी माऊंटेनिरिंगच्या टीमने सलग पाचव्या वर्षी रत्नदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. मात्र यंदा भरपूर कचरा आणि दारुच्या बाटल्यांचा खच आढळला. मर्द मावळ्यांच्या इतिहासाने गाजलेल्या या किल्ल्यावर मजा मारणाऱ्यांनी दारुच्या बाटल्या तेथेच टाकल्याने तेथे बंदोबस्ताची मागणी जनतेतून होत आहे.
प्रजासत्ताक दिनी जबाबदारीची जाणीव ठेवत स्वच्छता मोहीम आखण्यात आली. या मोहिमेला सार्थ हाक देत आणि फिनोलेक्स ऍकॅडमीच्या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांनी सकाळी 6.30 ते 8.30 पर्यंत मोहीम पूर्ण केली. साफसफाई करताना खाऊचे प्लास्टिक पॅकेट, पिण्याच्या पाण्यासाठी वा थंड पेयासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या किल्यावर आणि अवतीभोवती सापडल्या. त्या एका ठिकाणी गोळा करून पालिकेच्या टीमला कल्पना दिली. रस्त्याच्या ठराविक अंतरावर दारूच्या काचेच्या बाटल्या टाकलेल्या दिसल्या. या बाटल्या एका ठिकाणी गोळा करण्यात आल्या.
""दर महिन्याला असेच चित्र येथे पाहायला मिळते. किल्ला व भगवतीदेवीचे मंदिर पाहण्यासाठी देश - विदेशातून पर्यटक, भाविक येतात, त्यांनाही या साऱ्या गोष्टींचा त्रास होतो. समस्त रत्नागिरीकरांनी प्रत्येकाला जसे जमेल तसे योगदान देऊन आपली रत्नागिरी स्वच्छ रत्नागिरी करण्यात हातभार लावावा.''
- धीरज पाटकर
अध्यक्ष, जिद्दी माऊंटेनिरिंग
Web Title: Cleaning Ratnadurga Jiddi Mountaineering Ratnagiri Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..