वाह.. वाह ...! सफाई कामगाराचा असाही प्रामाणिकपणा...

cleaning worker return money in corporate office kokan marathi news
cleaning worker return money in corporate office kokan marathi news
Updated on

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : सफाई कामगाराने कचऱ्याच्या गाडीत मिळालेले दहा हजार रुपये कसई-दोडामार्ग नगरपंचायतीकडे सुपूर्द करुन मूळ मालकाला परत दिले आणि प्रामाणिकपणाचा नवा आदर्श समाजापुढे घालून दिला. बाबू पदू ताटे असे त्या प्रामाणिक कर्मचाऱ्याचे नाव आहे.  असे म्हणतात की, व्यवसाय कोणताही असो, तो प्रामाणिकपणे केला तर त्याचीही उंची वाढते. कचरा गोळा करणारा सर्वसामान्य सफाई कामगारही आपल्या पेशाला उच्च दर्जाचा मानत असेल तर पैशाचा क्षणिक मोहही त्याला आपल्या तत्वापासून ढळू शकणार नाही.

कचऱ्याच्या गाडीत मिळालेले दहा हजार रुपये परत

अशीच एक घटना दोडामार्गमध्ये घडली आणि सर्वसामान्यांचा माणुसकीवरचा विश्‍वास पुन्हा एकदा दृढ झाला. एका सफाई कामगाराने कचऱ्याच्या गाडीत मिळालेले दहा हजार रुपये कसई-दोडामार्ग नगरपंचायतीकडे सुपूर्द करुन मूळ मालकाला परत दिले आणि प्रामाणिकपणाचा नवा आदर्श समाजापुढे घालून दिला. बाबू पदू ताटे असे त्या प्रामाणिक कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अनवधानाने पैशांची पिशवी कचरा गाडीत​
दोडामार्ग शहरात आपल्या उदरनिर्वाहासाठी अनेकजण व्यवसाय करतात. भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे संजय भैरू जाधव हे त्यापैकीच एक. ग्राहकांची वर्दळ अधिक असल्याने ते नेहमीच व्यस्त असतात. नेहमीप्रमाणे कचऱ्याची गाडी येताच श्री. जाधव यांनी आपल्याकडील कचरा त्या गाडीत टाकला आणि अनवधानाने आपल्याकडील पैशांची पिशवी सुद्धा त्यासोबत कचरा गाडीत टाकली.

प्रामाणिकपणे पैसे केले परत

कचरा गाडी रिकामी करत असताना सफाई कर्मचारी बाबू पदू ताटे यांना ती पिशवी दिसली. त्यांनी पिशवीत पाहिले असता त्यात तब्बल दहा हजार रुपये आढळून आले .त्या कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे ते पैसे नगरपंचायतीमध्ये जमा केले योग्य ती शहानिशा केल्यावर ते पैसे संजय भैरू जाधव यांचे असल्याचे समजून आले. नगरपंचायत पदाधिकाऱ्यांनी ते पैसे मूळ मालकाच्या ताब्यात दिले . श्री . ताटे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वांनी कौतुक करत त्यांचा सत्कार देखील केला. खरोखरच पैशाच्या हव्यासापाई रक्ताची नाती एकमेकांच्या जीवावर उठत असताना श्री ताटे यांच्या कृतीतून माणुसकी आजही जिवंत असल्याचे ठळक झाले .त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक तालुक्‍यात होत आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com