मागील तीन-चार वर्षांत काजू पीक विविध कारणांनी अडचणीत आले. जिल्ह्यात यावर्षी काजू हंगाम लांबणार हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
वैभववाडी : काजू पिकाला (Cashew Crop) बदललेल्या वातावरणाचा तडाखा बसला असून, काही भागांतील काजू बी काळवंडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव काजू पिकावर झाला आहे. दोन फवारण्या घेतलेल्या बागांमध्येदेखील कीड रोग दिसून येत असल्यामुळे काजू उत्पादकांमध्ये (Cashew Manufacturers) चिंतेचे वातावरण आहे.