'मी वैफल्यग्रस्त नाही'; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis, Uddhav Thackeray

'मी वैफल्यग्रस्त नाही'; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

sakal_logo
By
अर्चना बनगे

सिंधुदुर्ग : तौक्ते वादळाच्या (Tauktae Cyclone) पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दौऱ्यावर आले आहेत. या दोघांच्या दौर्‍याचे फलित काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करत बाधितांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. तर सत्ताधारी राजकारण न करता मदत करून कसा दिलासा देता येईल याचा प्रयत्न करण्याची ग्वाही देत आहेत. नेत्यांच्या दौऱ्याच्या (Konkan Visit)निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.

(CM-uddhav-thackeray-criticism-on-devendra-fadnavis-kokan-Tauktae-Cyclone-visit-marathi-news)

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnvis)हेही कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणाने शिवसेनेला भरपूर दिले आहे. निसर्ग चक्रीवादळ असो वा तौक्ते वादळ, यात लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता शिवसेनेची देण्याची वेळ आली आहे; मात्र हात आखडता घेऊन केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. राजकारणात जेवढे प्रेम दाखविले जाते तेवढे आपत्ती काळातही कोकणावर सेनेने प्रेम दाखवावे, अशी कोपरखळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मारली.

हेही वाचा- विरोधकांनी कितीही टीका केली तरी मी कोकणवासियांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांचे कोकणवासीयांना आश्वासन

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray)सकाळपासून कोकण दौऱ्यावर आहेत. मी वैफल्यग्रस्त नाही, मी येथे दुःख जाणून घ्यायला आलो आहे. दिलासा देण्यासाठी आलो आहे. फोटोसेशनसाठी नाही. असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

सिंधुदुर्गमध्ये पोहोचल्यानंतर मालवण मधील वायरी गावातल्या नुकसानीची पाहणी करत असताना मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील आहेत. ते नक्कीच महाराष्ट्राला मदत करतील. नुकसानीबाबत त्यांना कळविण्यात आले आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. चक्रीवादळ भीषण होते. जे काही नुकसान झाले आहे ते केंद्राच्या निकषाप्रमाणे आम्ही मदत देणार आहोतच. आणि राज्य सरकार म्हणून आणखीन जे काही करता येणे शक्य आहे ते केले जाईल.एकूणच दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यातून कोकणाला काय मिळणार, याकडे मात्र कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

loading image
go to top