उद्धव ठाकरेंनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीचा फोटो पाहिला इन्स्टाग्रामवर अन्...

मतीन शेख
Sunday, 19 July 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर विशेष प्रेम आहे.

सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच दुर्गप्रेम आणि त्यांची फोटोग्राफीची आवड सर्वश्रृत आहे. छायाचित्रणातील त्यांची शोधक नजर अनेकदा समोर आली आहे. विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर त्यांनी पाहिले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत.

ऐतिहासिक स्थळांच्या घडामोडींबाबत मुख्यमंत्री सजग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर विशेष प्रेम आहे. तसेच ते प्रसिद्ध छायाचित्रकार आहेत.छायाचित्रकार असल्यामुळे सोशल मिडीयावर येणारी विविध छायाचित्रे त्यातही गडकोट किल्ले आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांच्या घडामोडींबाबत ते अधिक सजग असतात. यातून मुख्यमंत्री ठाकरे यांना इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्गाचा एका बुरुजाची पडझड झाल्याचे लक्षात आले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Instagram वरील #विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीच्या वृत्ताची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल. केंद्रातील Archeological Survey of India कडे किल्ल्याच्या डागडुजी व देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या सूचना. #indiantourism #fortsandpalaces #forts #MaharashtraTourism #vijaydurg #vijaydurgfort

A post shared by MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) on

 

वाचा - वाचा गावात युवकांचा 'तो' आयडॉल... पोलिस खात्यातील युवक काल कोरोना पॉझिटिव्ह तर आज निगेटिव्ह...

या पोस्टची लगेच दखल घेत, त्यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती कळविण्याचे तसेच पडझड रोखण्यासाठी आणि या दुर्गाच्या देखभालीबाबतही केंद्राकडील या खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना उद्धव ठाकरेंनी सूचना दिल्या आहेत.

जलदुर्गाच्या देखभालीचा मार्गही सूकर

इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झालेल्या विजयदुर्गच्या पडझडीच्या छायाचित्राची दखल घेत थेट भारतीय पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करण्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या प्रय़त्नामुळे विजयदुर्गच्या बुरूजाची पडझड थांबवणे शक्य होणार आहे. तसेच या जलदुर्गाच्या देखभालीचा मार्गही अधिक सूकर होणार आहे. एक पोस्ट पाहून मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा पुढाकार पाहून दुर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm Uddhav Thackeray saw the post of fall of Vijaydurg fort on Instagram