esakal | रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी; कोव्हॅक्सिनचे 3 हजार 330 डोस दाखल

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी; कोव्हॅक्सिनचे 3 हजार 330 डोस दाखल

रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी; कोव्हॅक्सिनचे 3 हजार 330 डोस दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 52 हजार 529 इतक्‍या जणांनी लस घेतली आहे. साठा अपुरा पडू नये, यासाठी वरिष्ठस्तरावर चर्चा करून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्याला कोव्हॅक्‍सीनचे 3 हजार 330 डोस प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यात लसीकरणासाठी 112 केंद्र निश्‍चित केली आहेत. त्यातील 70 टक्के केंद्रांवर 25 एप्रिलपर्यंत लसीकरण थांबवण्यात आले होते. लस उपलब्ध असलेल्या 35 केंद्रांवर मोहीम सुरू ठेवण्यात आली. लस अपुरी पडत असल्यामुळे गोंधळ निर्माण होत आहे. अनेक केंद्रांवरुन लोकांना माघारी परतावे लागत आहे. रविवारी (25) रात्री उशिरा 10 हजार कोविशिल्डचे डोस प्राप्त झाले होते. त्याचे त्वरित वितरण करून बंद पडलेली मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. कोविशिल्ड दाखल झाली, मात्र कोव्हॅक्‍सीनचा तुटवडा होता. दुसरा डोस देण्यासाठीही लस मिळत नव्हती. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे. मंगळवारी त्वरित कोव्हॅक्‍सीनचे 3 हजार 330 डोस शासनाकडून मिळाले आहेत.