esakal | रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण  मिश्रा यांची बदली

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : कोरोना (Covid 19) महामारीच्या काळामध्ये धरसोड करणारे निर्णय आणि संसर्ग रोखण्यामध्ये आलेल्या अपयशामुळे वादातीत ठरलेले जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची (Collector Laxminarayan Mishra) बदली झाली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे चेअरमन अॅड. मॅनेंजिंग डायरेक्टर या पदावर बदली झाली आहे. त्यांच्याजागी अजून कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या बदलीनंतर सव्वा दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नियुक्ती झाली होती. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केले होते. जिल्ह्याचा भौगोलिक आणि सामाजिक माहिती त्यांना होती. त्यामुळे जिल्ह्याला त्यांचा चांगला फायदा होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. सुरवातीला चांगल्या कामाची चमक त्यांनी दाखविली. मात्र कोरोना महामारीमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय धरसोड वृत्तीचे होते.

हेही वाचा- महाविकास आघाडी सरकारकडून रत्नागिरीला मिळणार मोठा निधी

या महामारीतून सावरत असताना दुसरी लाट आली. टाळेबंदीमुळे नागरिक, व्यापारी सर्वसामान्य हैराण झाले होते. अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. राज्यात सर्वंत्र कोरोनाचा संसर्ग कमी येत होता. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात वाढता आलेख होता. संसर्ग रोखण्यासाठी अपेक्षित आणि कठोर निर्णय घेण्यात ते कमी पडले, असे आरोप करीत जिल्हाधिकारी हटाव अशी चळवळ उभारण्यात आली होती. नागरिकांमध्येही ते घेत असलेल्या निर्णयाबद्दल नाराजी होती. त्यामुळे मुदतीपूर्वीच त्यांची अचानक बदली झाली आहे.

loading image