दुसऱया मजल्यावरील गॅलरीत रेनकोट वाळत घालताना तो तरुण स्टुलावरून कोसळला अन्

kiran pawar
kiran pawar
Updated on

चिपळूण : तालुक्यातील ओमळी-पवारवाडी येथील किरण उदय पवार मधील उमदा तरूण. डीबीजे महाविद्यालयात वाणिज्य शाखेत दुसऱया वर्षात नव्या शैक्षणिक वर्षापासून तो प्रवेश घेणार होता. गेल्या वर्षीच त्याचा प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतरही त्याने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. तो त्यासाठी सासूसवाडीत खेर्डी (जि. रत्नागिरी) येथे आला होता. या तरुणावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर बुधवारी दुर्दैवी प्रसंग ओढावला.

शहरालगतच्या खेर्डी येथील रहिवासी व डीबीजे महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला किरण उदय पवार (वय 22) याचा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. आज ही घटना घडली. 

मूळचा तालुक्‍यातील ओमळी-पवारवाडी येथील किरण पवार याचा वर्षभरापूर्वीच प्रेमविवाह झाला होता. त्यातच त्याचे शिक्षणही सुरू होते. डीबीजे महाविद्यालयात तो वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. त्यासाठी तो खेर्डी-शिगवणवाडी येथे सासरवाडीत वास्तव्यास आला होता. येथील दत्त प्लाझा इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये ओला रेनकोट वाळत घालत होता. त्याचवेळी त्याच्या पायाखालील स्टूलवरून तोल जाऊन गॅलरीतून खाली कोसळला. सिमेंटच्या पत्र्याच्या सीटवर पडून पत्रा तुटून तो पार्किंग क्षेत्रात पडला. त्याच्या डोक्‍याला, छातीला, तोंडाला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे रक्तस्त्रावही झाला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत येथील पोलिस ठाण्यात सानिका सुदेश शिर्के (रा. खेर्डी, शिगवणवाडी) यांनी वर्दी दिली. किरण याने वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाची परीक्षा दिली आहे. तो एनएसएसचा आदर्श विद्यार्थी म्हणूनही ओळखला जात होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mumbai-Goa Highway Traffic Crisis in Chiplun:
Eco-Friendly Ganeshotsav
Pugaon Maharashtra hazardous chemical leakage news
Mumbai-Konkan Ro-Ro Service
Marathi News Esakal
www.esakal.com