सिंधुदुर्गात जाणार आहात, तर `याकडे` लक्ष द्या... 

Comming To Sindhudurg From Outside Read This Rule
Comming To Sindhudurg From Outside Read This Rule
Updated on: 

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - केंद्र व राज्य शासनाने परराज्यांत अडकलेले भाविक, मजूर, कामगार यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. परजिल्ह्यांत अडकलेल्यांसाठीही अशा पद्धतीची सोय करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरील जिल्ह्यांमधून लोक येण्याची शक्‍यता आहे.

जे लोक ग्रीन आणि ऑरेंज झोनमधून येतील त्यांना 28 दिवस होम क्‍वारंटाइन ठेवले जाणार आहे. जे लोक मुंबई, पुणे व वेळोवेळी घोषित केल्या जाणाऱ्या हॉटस्पॉट क्षेत्रातून येतील अशा लोकांना 14 दिवस संस्थात्मक क्‍वारंटाइन व त्यानंतर 14 दिवस होम क्‍वारंटाइन ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. 

अशा प्रकारच्या क्‍वारंटाइनसाठी ग्रामस्तरावर तसेच नगरपंचायत क्षेत्रात प्रभाग, वॉर्डस्तरीय नियंत्रण समिती स्थापन केली आहे. ग्रामस्तरावरच्या समितीत सरपंच हे त्या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तलाठी हे सहअध्यक्ष आहेत. विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव, कृषी सहायक, आरोग्यसेवक, महिला बचतगटांचे ग्रामसंघ अध्यक्ष, सचिव, पोलिसपाटील, दोन सरपंचांनी नियुक्त केलेले सदस्य व ग्रामसेवक हे सदस्य सचिव असणार आहेत. असे एकूण 11 सदस्य राहतील. 

पालिका क्षेत्रात संबंधित नगर पंचायत, परिषदेचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतील. मुख्याधिकारी हे सहअध्यक्ष आहेत. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय यांनी नेमलेले आरोग्य अधिकारी, प्रभाग, वॉर्डमधील नगरसेवक, पोलिस अधिकारी, मुख्याधिकारी यांनी नियुक्त केलेले दोन प्रतिष्ठित नागरिक हे सदस्य आहेत. नगरपंचायतीने नेमलेले नोडल अधिकारी हे सदस्य सचिव असतील. 

या समितीने गावपातळीवर संस्थात्मक क्‍वारंटाइन कक्षासाठी सर्व त्या आवश्‍यक सोयी-सुविधांनी युक्त अशी इमारत तयार करून ठेवणे, बाहेरून गावात आलेल्या व्यक्तींची नाक्‍यावर तपासणी झाली आहे का, याची खात्री करणे, नंतरच त्या व्यक्तीस होम किंवा संस्थात्मक क्‍वारंटाइनसाठी पाठविणे, संस्थात्मक क्‍वारंटाइन करण्यात आलेल्या व्यक्तींच्या निवासाची व इतर आवश्‍यक सोयी-सुविधांची व्यवस्था करणे, क्‍वारंटाइनमधील व्यक्तींची दैनंदिन वैद्यकीय तपासणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्राची व नागरी भागात ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालयाची असणार आहे. एखाद्या व्यक्तीने आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करावी.

कोणत्याही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या कारवाईसाठी ग्रामपातळीवर ग्रामसमिती व नागरीस्तरीय समिती प्राधिकृत केल्याचे आदेश मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोनमध्येच 
केंद्राने जाहीर केलेल्या ग्रीन झोन जिल्ह्यांच्या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असला तरी जिल्हा सध्या ऑरेंज झोनमध्ये आहे. या जिल्ह्यात 29 एप्रिलला एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. केंद्राने जाहीर केलेली यादी 30 एप्रिलला निर्माण केली आहे; मात्र त्यासाठी गेल्या आठवड्याचा आधार घेण्यात आला. त्यात सिंधुदुर्ग ग्रीन झोनमध्ये दाखविला आहे. आपल्याकडे एक पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोनच्या रेंजमध्ये येतो. या विषयी राज्य शासनामार्फत केंद्राकडे जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती मंजुलक्ष्मी यांनी दिली. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pali Ramdas Athawale Constitution Statement RPI To Connect All Communities With Its Social Justice And Equality Agenda
Jaigad-Chiplun-Satara Expressway
Rajapur Kodavali new dam seven times water storage
Mukhyamantri Vayoshri Yojana
Marathi News Esakal
www.esakal.com