esakal | कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

kokan railway

कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाड : कोकणाबरोबरच दक्षिण भारत व इतर राज्यांना जोडणाऱ्याकोकण रेल्वेचा प्रवास अधिक जलद व सुखकर होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर या 46 कि.मी. रेल्वेमार्गाचे दरम्यानचे दुपदरी करणाचे काम पूर्ण झाल्याने हा जलद प्रवास शक्य होणार आहे.

निसर्गरम्य कोकण रेल्वे वरील प्रवास सध्या एकेरी मार्गावर असल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्या करता अनेकदा क्रॉसिंग साठी इतर रेल्वे गाड्या थांबावे लागत असतात याचा मोठा फटका पॅसेंजर गाड्यांना होत असतो त्यामुळे प्रवासाचे अंतर वाढत असते. प्रवाशांची ही अडचण लक्षात घेत कोकण रेल्वेने रेल्वे मार्गावरील दुपदरीकरणाला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रवासाला गती मिळणार आहे.

आता या मार्गावरील कोंडी दूर होणार असल्याने प्रवासाचा वेळही वाचणार आहेत. कोकण मार्गावरील प्रवास जलद व सुखकर होण्यासाठी रोहा ते ठोकूर असे सातशे किलोमीटर मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. त्याचाच एक भाग असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वीर या 46.8 कि.मी. रेल्वे मार्गावरील दुपदरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर गाड्या जास्त वेळ न थांबविता कमी कालावधीत आपला निश्चित पल्ला गाठू शकतील.

सध्या कोकण रेल्वे मार्गावर दिवा ते रोहा दिवा ते मडगाव रत्नागिरी ते दादर अशा प्रवासी गाड्या सुरू आहेत परंतु क्रॉसिंग मुळे या गाड्यांना नियोजित स्थळी पोहोचण्यास लागणारा विलंब असा दूर होईल.कोकण रेल्वेची हद्द रोहा ते ठोकूरपर्यंत आहे. मध्य रेल्वेच्या हद्दीतील रोहा ते कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील वीरपर्यंत 46.8कि.मी. अंतराचे दुपदरीकरणाचे काम 30 ऑगस्ट रोजी पूर्ण झाले. आता रेल्वेमार्गाची गाडय चालविण्याची क्षमता व ट्रेन संचालनातील कार्यक्षमता वाढणार असल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.

loading image
go to top