'या' तीन कातळशिल्पांचे होणार आता विशेष संवर्धन...

conservation of slaughterhouses from Archeology department
conservation of slaughterhouses from Archeology department

रत्नागिरी - देवूड, कोळंबे, देवाचे गोठणे येथील कातळशिल्पांच्या जतन व संवर्धनासाठी १ कोटी ४ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून पुरातत्त्व विभागाने संचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित कातळशिल्पांचे जतन व संवर्धनाचे प्रस्ताव केले जाणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून कातळशिल्पांवरील संशोधनाला वेग आला आहे. सुधीर रिसबुड, धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी जिल्ह्यातील कातळ शिल्पांची शोध मोहिम हाती घेतली होती. त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन कातळशिल्पांचे संरक्षण व्हावे यासाठी या पथकाकडून विशेष प्रयत्न सुरू होते.

जिल्ह्यातील ५२ गावातून सुमारे एक हजार कातळशिल्प आढळली आहेत. ही सर्व अश्‍मयुगीन काळातील आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने शासनातर्फे पुढाकार घेतला जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व कातळशिल्पांचे सर्व्हेक्षण झाले आहे. दहा ठिकाणाची कातळशिल्पे राज्य संरक्षित करण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत; परंतु दोन वर्ष होऊनही राज्य संरक्षित संदर्भात कोणताच निर्णय झालेला नाही. दहा कातळशिल्पांपैकी तीन कातळशिल्पे जतन, संवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव पुरातत्व विभागाने तयार केला आहे. तो संचालक कार्यालयाकडेही पाठविल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले. तीन कातळशिल्पांच्या जतन व संवर्धनासाठी निधी मिळेल असा विश्वास पुरातत्व विभागाने व्यक्त केला आहे. कातळशिल्पांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी आवश्‍यक सुविधा, दगडी कुंपण, प्रेक्षक दर्शनिका, मनोरा, माहिती फलक व निवारा शेड बांधण्यात येणार आहे.

संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावे

रत्नागिरी जिल्ह्यातील कातळशिल्प पाहण्यासाठी स्विडन, अमेरिका, आस्ट्रेलिया, युके, फ्रान्स येथून पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. शिल्पे अतिप्राचीन असल्याने त्यामध्ये मानवी संस्कृतीच्या इतिहासाची माहिती मिळू शकते. कातळावर चिरेखाणींचे खोदकाम, रस्ता करत असताना शिल्पे नष्ट होऊ नयेत, यासाठी ती राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com