पावसाळा तोंडावर असूनही पुलाचे काम संथ गतीने

लक्ष्मण डुबे
शुक्रवार, 10 मे 2019

रसायनीतील मुख्य रस्त्यावरील तुराडे गावा जवळील ओढ्यावर आणि  आपटे गावाच्या हद्दीत एका ओढ्यावरील पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने तुराडे आणि आपटे गावातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाळा जवळ आला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम लवकरात लवकर बांधकाम पुर्ण करावे आशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

रसायनी (रायगड) : रसायनीतील मुख्य रस्त्यावरील तुराडे गावा जवळील ओढ्यावर आणि  आपटे गावाच्या हद्दीत एका ओढ्यावरील पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने तुराडे आणि आपटे गावातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाळा जवळ आला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम लवकरात लवकर बांधकाम पुर्ण करावे आशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

रसायनीतील दांड पेण या मुख्य राज्य मार्गावरील आपटे आणि तुराडे गावाच्या हद्दीतील असलेला सुरवातीचा दगडी पुल खुप जुने झाले होते. भविष्यात पुलाला धोक्याची शक्यता असल्याने, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने साधारण तीन महिन्यापुर्वी जुने पुल पाडुन नवीन पुल बांधण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत पुलांचे काम पुर्ण होणार होते असे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र काम संथ गतीने सुरू असल्याने पावसाळ्यापुर्वी पूर्ण होण्याची शक्याता कमी असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहे. तर सध्या काँलम भरणे काम सुरू आहे, अजुन स्लॅप व इतर काम बाकी आहे. 

या रस्त्यावरून  पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील कारखाने तसेच रसायनी पाताळगंगा परीसरातील गावांतील वाहनांची उरण, पेण, अलिबागकडे मोठी वर्दळ सुरू असते. पुलाचे काम सुरू असल्याने तुराडे गावा जवळ वाहतुक पश्चिमेच्या बाजुच्या जुन्या रस्त्या वरून वळविण्यात आली आहे. आपटे गावाच्या हद्दीत पुलाचे काम चालु असल्याने वाहतुक सध्या कच्च्या रस्त्याने सुरू आहे.

दरम्यान, येथे रस्त्यावरून जाताना वाहन चालक त्रस्त होत आहे. तर पावसाळ्यापुर्वी पुलांचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी आमचे नियोजन आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल उप अभियंता एस एम कांबळे यांनी सांगितले. 

पावसाळा जवळ आला आहे. पावसाळ्यापुर्वी दोन्ही ठिकाणची पुलांचे काम पुर्ण झाले पाहिजे, काम पुर्ण झाले नाही तर आपटे गावाच्या हद्दित पुलाचे काम चालु असलेल्या ठिकाणी कच्च्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकांचे खुप हाल होत आहेत. पुलांचे बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करावे.- ज्ञानेश्वर माळी, गुळसुंदे शिवसेना विभाग प्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Construction Of bridge are going work slow in Rasayani raigad district