पाताळगंगा नदीवरील दुसऱ्या पुलाचे बांधकाम रखडले

लक्ष्मण डुबे 
मंगळवार, 14 मे 2019

रसायनी (रायगड) : पाताळगंगा नदीवर जुन्या पुलाला खेटुन एमआयडीसीच्या दुसऱ्या पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. वेळेत  पुर्ण होईल की नाही अशी शक्यता कारखानदांर व नागरिक व्यक्त करत आहे. तर काम वेळेत पुर्ण करून पुला वरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी आहे.

रसायनी (रायगड) : पाताळगंगा नदीवर जुन्या पुलाला खेटुन एमआयडीसीच्या दुसऱ्या पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. वेळेत  पुर्ण होईल की नाही अशी शक्यता कारखानदार व नागरिक व्यक्त करत आहे. तर काम वेळेत पुर्ण करून पुला वरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी आहे. पुलाचे काम वेळेत पुर्ण करण्यासाठी एमआयडीसीचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या पराडे ते श्री सिध्देश्वरी या मुख्य रस्त्यावर पाताळगंगा व अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात तसेच वडगाव, इसांबे, माझगाव, चावणा, जांभिवली, कराडे खुर्द या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतूकीचा ताण पडू लागला होता. एमआयडीसीने या रस्त्याचे मजबूतीकरण व रूंदीकरणांचे काम जून 2015 मध्ये पूर्ण केले आणि रस्ता वाहतूकीस खुल्ला केला आहे. 

मात्र मार्गावरील पाताळगंगा नदी वरील दुसऱ्या पुलाचे बांधकाम रखडले गेले होते. पावसाळ्यात जुन्या पुलावर लवकर खड्डे पडत असल्याने जाताना वाहन चालकांचे हाल होत आहे. त्यामुळे दुसऱ्या पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोशिएशने सातत्याने सुरू ठेवली होती. तसेच सकाळने मागणीच्या वेळोवेळी प्रसिद्धी दिली. तर जानेवारी 2018 मध्ये बांधकामाला सुरवात झाली आहे. बांधकामासाठी सुमारे बारा कोटी 80 लाख इतका खर्च करण्यात येणार आहे. सध्या बांधकाम वेग बघता वेळेत पुर्ण होईल की नाही शक्यता कारखानदांर आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या एकाच पुलावर पडणारा वाहतूकीचा ताण पडत आहे. तसेच पावसाळ्यात या पुलावरील पाण्याचा सुरळीत निचरा होत नाही. त्यामुळे लवकर पावसाळ्याच्या सुरवतीलाच खड्डे पडतात. खड्यांमुळे जाताना मागील पाच सहा वर्षापासून खुप हाल होत आहे. एमआयडीसीने पावसाळ्या पुर्वी दुस-या पुलाचे काम पुर्ण करून वाहतुकीस पुल खुला केला पाहीजे आशी मागणी कारखानदांर आणि नागरिकांनी केली आहे. 

''दुसऱ्या पुलाचे मुख्य स्लँपचे काम पुर्ण झाले आहे. एक छोटा स्लँप व दोन्ही बाजुचे रस्त्याला जोडण्याचे काम, दोन स्लँप मधील सध्यांचे काम तसेच दोन्ही बाजूचे पदपथांचे काम बाकी आहे. पुलाचे बांधकाम पुर्ण करण्यासाठी कंपनीला 17 जुन 2019 पर्यंत मुदत आहे. तो पर्यंत काम पुर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहे.'' 
- राजेंद्र बेलगमवार, उप अभियंता, पाताळगंगा एमआयडीसी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The construction of the second bridge on the Patalganga river came to an end