चिपळुणात महामार्ग चाैपदरीकरणातील बांधकामे जमीनदोस्त 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

चिपळूण - पाऊस, गणेशोत्सव आणि रेखाकनांच्या वादामुळे रखडलेल्या चौपदरीकरणातील पहिल्या टप्प्याच्या कामास शहरात सोमवारी गतीने सुरवात झाली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरातील संपादित जागेत असलेली बांधकामे काढण्यात आली. सुमारे शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा, पोलिस आणि जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने रस्त्याकडेचा परिसर सपाट केला. 

चिपळूण - पाऊस, गणेशोत्सव आणि रेखाकनांच्या वादामुळे रखडलेल्या चौपदरीकरणातील पहिल्या टप्प्याच्या कामास शहरात सोमवारी गतीने सुरवात झाली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरातील संपादित जागेत असलेली बांधकामे काढण्यात आली. सुमारे शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांचा ताफा, पोलिस आणि जेसीबी, पोकलॅण्डच्या साह्याने रस्त्याकडेचा परिसर सपाट केला. 

अनेक वर्षाची रस्त्याच्या कडेला असलेली झाडेही जमीनदोस्त करण्यात आली. जोमाने कारवाई सुरू असल्याने यात कोणाचा अडथळा आला नाही.मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी तालुक्‍यातील कामकाज प्रगतिपथावर आहे. मात्र प्रत्यक्षात शहरातील चौपदरीकरणाच्या कामास सुरवात झाली नव्हती. गणेशोत्सवापूर्वी बांधकामे काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र नागरिकांच्या भावना लक्षात गणेशोत्सावानंतर बांधकामे काढण्याचे ठरले होते. त्यानुसार आज चेतक कंपनीने बहादूरशेखनाका येथून रुंदीकरणाची मोहीम हाती घेतली.

एकाच दिवसात कारवाई पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रसामुग्री घटनास्थळी उपलब्ध होती. दोन जेसीबी, दोन पोकलॅण्ड, 10-12 डंपर, पोलिस कर्मचारी सुमारे शंभर कर्मचाऱ्यांच्या ताफा आदींची व्यवस्था होती. राष्ट्रीय महामार्ग तसेच मूल्याकन करणारे अधिकारीही उपस्थित होते.संपादित जागेचा मोबदला बहुतांशी बाधित कुटुंबांना मिळाला मात्र त्यांनी अद्याप बांधकामे हटवलेली नाहीत. अशा इमारतींसमोरील सर्व बांधकाम, कठडे, पोल, बोर्ड, झाडी जमीनदोस्त केले.बांधकाम काढेपर्यंत संबंधित व्यावसायिकांनी स्वतः कोणतीही हालचाल केलीच नव्हती. 
 
स्वतःहून टपऱ्या बाजूला केल्या 
काहीही झाले तरी बांधकामे काढणारच याची जाणीव झाल्यानंतर अनेकांनी स्वतःहून टपऱ्या काढून बाजूला केल्या. मोठी झाडे जमिनदोस्त करताना दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवण्यात येत होती. काम नियमित पुढे सुरू राहणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले. 
 
गणपती मंदिर अन्‌ पेट्रोल पंपही 
मळ्यातील गणपती मंदिर संपादित जागेत येत आहे. मंदिराशेजारील कठडेच आज काढण्यात आले. संबंधित मालकांनी स्वतः बांधकाम काढण्याची हमी दिली. शेजारील पेट्रोल पंपासमोरील केवळ कठडे आणि फलक काढण्यात आले. पंप चालकानेही स्वतः बांधकाम काढणार असल्याचे सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: constructions in Mumbai Goa four track removed in Chiplun