शेतकऱ्यांचा एकही रुपया न घेता त्यांना आम्ही या सर्व जमिनीचा सर्व्हे करून देऊ, असे मान्य केले आहे.
दोडामार्ग : सासोली येथील सामायिक जमिनीत मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखले. जोपर्यंत पोटहिस्सा ठरत नाही, तोपर्यंत आमच्या जमिनीत मोजणी करायची नाही, अशी भूमिका घेत स्वतःचे हात बांधून ठिय्या आंदोलन केले; मात्र सहभागदारांनी आपल्या जमिनी पहिल्यांदा मोजणी करून निश्चित करा, असे सांगितल्यावर स्थानिक शेतकऱ्यांनी (Farmers) अधिकाऱ्यांकडे या मोजणीसंदर्भात स्वतःच्या लेखी हरकती दिल्या. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात अधिकाऱ्यांनी मोजणीची कार्यवाही पूर्ण केली.