सर्वसामान्यांना खाद्यतेलाची फोडणी झोंबली; दर वाढले, आर्थिक बजेट कोलमडले

cooking oil rate also increased in market in ratnagiri
cooking oil rate also increased in market in ratnagiri
Updated on

चिपळूण (रत्नागिरी) : एकीकडे पेट्रोल, डिझेलची दरवाढ कायम असतानाच दुसरीकडे खाद्यतेलाचे दरही वाढत आहेत. गेल्या ४५ दिवसांच्या तुलनेत करडई, सूर्यफुलासह सर्वच खाद्यतेलांचे भाव लिटरमागे चार ते १५ रुपयांनी वाढले आहेत. ‘कोरोना’च्या संकटामुळे आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता महागाईचा फटकाही सहन करण्याची वेळ त्यांच्यावर 
आली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचे संकट, लॉकडाऊनचा बसलेला फटका यातून सावरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची गेल्या काही महिन्यांपासून धडपड सुरू आहे. अनेकांची आर्थिक ओढाताण होत असतानाच स्वयंपाक घरात रोज लागणाऱ्या खाद्यतेलाचा दराचा आलेख चढताच आहे. जानेवारीत सूर्यफूल तेलाचा दर ९८ रुपये प्रतिलिटर होता. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ११० रुपये दर होता. मार्चपर्यंत सूर्यफूल तेल लिटर मागे १३४ रुपये झाले. त्यात पुन्हा १४ रुपयांची वाढ झाली असून सध्या सूर्यफूल तेलाचा भाव लिटरमागे १३४ रुपये झाला आहे.

अन्य खाद्यतेलांच्या दरातही वाढ झाली आहे. यात १६४ रुपये प्रती लिटर या दराने मिळणारे करडई तेलाचा भाव हा सहा रुपयांनी वधारला असून सध्या १७० रुपये प्रती लिटर दर आहे, अशी माहिती चिपळुणातील व्यापारी संदेश रेडीज यांनी दिली. शेंगदाणे तेलाचे दर गेल्या ४५ दिवसांत लिटरमागे चार रुपयांनी वाढले असून सध्या १५० रुपये असा भाव आहे. १५० रुपये प्रती लिटर भावाने मिळणाऱ्या मोहरीच्या तेलासाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिकचे दहा रुपये मोजावे लागत आहेत.

सोयाबीन तेलाचे भावही लिटरमागे तब्बल १४ रुपयांनी वाढले आहेत. सध्या १२४ रुपये प्रती लिटर असा भाव आहे, तर १०० रुपये प्रति लिटर असा भाव असलेले पाम तेल लिटरमागे ११५ रुपयांच्या घरात गेले आहे. गेले काही महिने तिळाच्या तेलाचे भाव स्थिर होते; परंतु गेल्या काही दिवसांत त्यात दहा रुपयांची वाढ झाली असून सध्या १८० रुपये प्रतिलिटर दराने त्याची विक्री होत असल्याचे रेडीज यांनी सांगितले.

खाद्यतेलांचे दर लिटरप्रमाणे

  •     सूर्यफूल    १२० ते १३४
  •     करडई    १६४ ते १७०
  •     शेंगदाणे    १४६ ते १५०
  •     मोहरी    १५० ते १६०
  •     सोयाबीन    ११० ते १२४
  •     पाम तेल    १०० ते ११५
  •     तीळ तेल    १७० ते १८०

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com