esakal | दिलासादायक ! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्‍क्‍यावर 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Affected Patient Healing Rate 90 Percent In Ratnagiri District

* एकूण बाधित रुग्ण 8,178 
* निगेटिव्ह रुग्ण 44,648 
* बरे झालेले रुग्ण 7,384 
* एकूण मृत रुग्ण 302 
* उपचाराखालील रुग्ण 401 

दिलासादायक ! रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्‍क्‍यावर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोरोना संसर्गाबाबत जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसभरात केवळ 12 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. एकूण बाधितांची संख्या 8 हजार 178 झाली आहे तर तब्बल 87 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.29 टक्केवर गेले आहे. दिवसभरात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 302 वर गेली आहे. मृत्यूदर मात्र वाढत असून तो 3.69 टक्केवर गेला आहे. 

जिल्ह्यावरील कोरोनाचा फास ढिला होताना दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये बाधितांचा आकडा दोनशे ते अडीचशेपर्यंत गेला. वाढत्या आकड्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण होते; मात्र गेल्या दीड महिन्यांपासून कोरोनाचा प्रभाव कमी होत ऑक्‍टोबरमध्ये आणखी खाली आला आहे. आजतर जिल्ह्यात केवळ 12 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तीन महिन्यातील हा सर्वांत निचांकी आकडा आहे. यामध्ये आरटीपीसीआरमध्ये 7 तर अँटिजेन चाचणीत 5 रुग्ण सापडले. यामध्ये दापोली 1, चिपळूण 6, रत्नागिरी 3, लांजा 2 येथील रुग्णांचा समावेश आहे तर मंडणगड, खेड, गुहागर, संगमेश्‍वर, राजापूर या पाच तालुक्‍यांमध्ये एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. बाधित रुग्ण सापडण्यामध्ये नेहमीच आघाडीवर असलेल्या रत्नागिरी तालुक्‍यात प्रथमच केवळ 3 रुग्ण सापडले आहेत. 

जिल्ह्यातील आज दोघांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये रत्नागिरीतील एक महिला आणि राजापुरातील एका पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 302 झाली असून मृत्यूदर वाढून 3.69 टक्के झाला आहे. दिवसभरात 87 जणांनी कोरोनावर मात केली असून बरे होणाऱ्यांची संख्या 7 हजार 384 झाली आहे. हे प्रमाण आता 90.29 टक्केवर गेले आहे. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 401 आहे. 


 

 
 

loading image